पूर्णा । प्रतिनिधी :-
पूर्णा तालुक्यातील सारंगी मीठापुर परिसरामध्ये एका अज्ञात पस्तीस वर्षीय इसमाचा गोदावरी नदीच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दिनांक 5 मार्च पूर्वी घडली असून या प्रकरणी चुडावा पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील सारंगी मीठापुर परिसरामध्ये गोदावरी नदीचे पात्र सध्या पाणी सोडण्यात आल्यामुळे पात्र भरुन वहात आहे. या नदी पात्रांमध्ये दिनांक 5 मार्च पूर्वी गावालगत असलेल्या नदीवर दिनांक 5 मार्च पूर्वी एका पस्तीस वर्षीय अज्ञात इसमाचा मृतदेह तरंगताना आढळून आले ते दिसताच सारंगी मीठापुर येथील ओमप्रकाश वसमत कर यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. दरम्यान चुडावा पोलिसांच्या पथकाने घटनास्थळाला भेट देऊन मयत इसमाची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्याचे नाव आढळून आले नाही.
याप्रकरणी पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पंडित हे करीत आहेत.

