shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडून आपले जीवन यशस्वी करण्याचा केलेला प्रयत्न हा इतर युवकांना आदर्श ठरणार - युवा उद्योजक अमोलराज इंगळे.

नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडून आपले जीवन यशस्वी करण्याचा केलेला प्रयत्न हा इतर युवकांना आदर्श ठरणार - युवा उद्योजक अमोलराज इंगळे.
इंदापूर प्रतिनिधी:वडापूरी येथील मातोश्री व्यापार संकुलन मध्ये द हेअर वर्ल्ड या केशकर्तनालय या सर्व सोयींनी युक्त व्यवसायाचे उद्घाटन युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते(दि. ६मार्च२०२२ )रोजी संपन्न झाला.
यावेळी मातोश्री व्यापार संकुल चे मालक नवनाथ भोंग, युवा नेते पांडुरंग शिर्के, युवा नेते दत्तात्रय गायकवाड, जय हनुमान फिटनेस क्लबचे संस्थापक अध्यक्ष किरण गोसावी, महेश नलवडे पोलीस पाटील, माजी उपसरपंच महेश देशमुख, सुशील नलवडे, ओमकार नलवडे, मंगेश माने, रोहित मोहिते, धीरज काटकर, विशाल नलवडे ,बाबू पवार ,अक्षय सूर्यवंशी ,किरण देवकर ,बिभीषण खोचरे ,महेश शेलार प्राप्तीश बर्गे, अक्षय शेलार ,किरण शिर्के, रणजीत भोसले ,गणेश नलवडे, निलेश माने इत्यादी उपस्थित होते.
यावेळी अमोलराजे इंगळे म्हणाले की वडापुरी -पंधारवाडी गावानजीक मातोश्री व्यापार संकुल मध्ये ऋषिकेश अनिल शेलार याने नावीन्यपूर्ण असे अद्यावत सर्व सोयींनी युक्त द हेअर वर्ल्ड या नावाने केशकर्तनालयाचे दुकान ग्राहकांसाठी उभारले असून या व्यवसायातील मुख्य प्रवीण माने यांच्या मार्गदर्शनाखाली अनुभवी कारागीर यामार्फत ऋषिकेश शेलार हा व्यवसाय चालवत आहे. या युवकाने नोकरीकडे न वळता नाविन्यपूर्ण व्यवसाय निवडून आपले जीवन यशस्वी करण्याचा केलेला प्रयत्न हा इतर युवकांना आदर्श ठरणार आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये नोकरी मिळणे कठीण झाले असून कौशल्यपूर्ण शिक्षण घेऊन युवकांनी उत्तम व्यवसाय निवडून आपले जीवन सुधारावे असे मत त्यांनी व्यक्त केले.
या उद्घाटन कार्यक्रमावेळी उपस्थित असणाऱ्या मध्ये अमोलराजे इंगळे यांच्या बरोबर जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या गट, गन रचना आरक्षणाबाबत चर्चा होत होती. तसेच यावेळी अमोलराजे इंगळे इच्छुक असल्याने त्यांच्या उमेदवारीबाबतीत ही यावेळी चर्चा होत असल्याचे दिसून आले.
close