शिर्डी । प्रतिनिधी:-राहाता तालुक्यातील नांदूरखी बुद्रुक येथील गोदावरी उजव्या कालव्याच्या जवळ असलेल्या श्री कृष्ण मंदिर येथील दशक्रिया विधी घाटा वरील गेली तीन वर्षांपासून या ठिकाणी विद्युत संच असलेल्या विद्युत वाहक तारांना एक कावळा वीज प्रवाह चालू असतांना विजेला लटकून मृत्युमुखी पडला होता.
या दुःखद घटनेची चक्क येथील दश क्रिया विधी घाटावर जमा होणाऱ्या कावळ्यांनी या दुःखद घटनेची गंभीर दखल घेऊन आपलाच जोडीदार या ठिकाणी मृत्युमुखी पडला म्हणून चक्क दशक्रिया विधीच्या वेळी या परिसरात असणाऱ्या कावळ्यांनी बहिष्कार टाकून पिंड दानाच्या वेळी काक स्पर्श न करण्याचा निर्णय घेतल्याने येथील व शिर्डी परिसरातील दुःखद झालेल्या मयताच्या नातेवाईक मध्ये एक गंभीर प्रश्न निर्माण झाला होता काक स्पर्श होत नसल्याने अनेक लोकांनी पुणतांबा येथील गोदावरी च्या तीरावर काक स्पर्श किंवा पिंड दान करण्याचा पायंडा सुरु केला होता नांदूरखी खुर्द डोरहले शिर्डी व नांदूरखी बुद्रुक परिसरातील लोकही पिंडदाना चा विधी पुणतांबा या ठिकाणी करून इतर पाहुण्यांना दुःख सांत्वन करण्याचा कार्यक्रम नांदूरखीच्या दशक्रिया विधी ठिकाणी पार पाडत असून घरातील मृत झालेल्या व्यक्तीच्या दुःखाने सावरासावर करत असताना आपण दशक्रिया विधी नांदूरखी ला ठेवायचा कि पुनतांब्याला या चिंतेने सदर कुटुंब चिंतेत असायचे मात्र घरातील मृत्य पावलेल्या व्यक्तीचा दशक्रिया विधी पिंड दानाच्या वेळी काक स्पर्श झाला तर सदर मनुष्याला स्वर्गात शांती लाभते व त्या कुटुंबालाही आपण आपल्या घरातील मृत व्यक्तीच्या ऋणातून मुक्त झाल्याचा भास होतो मात्र गेली तीन वर्षांपासून विद्युत वाहकाच्या तारांमुळे मृत पावलेल्या समस्त कावळ्या चा काक स्पर्श न करण्याचा निर्णय हा या कावळ्यांनी बहिष्कार टाकला की काय असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडत होता.
मात्र काही दिवसांपासून या पवित्र ठिकाणी काकस्पर्श होत असल्याने इतर ठिकाणी दशक्रिया विधीला जाणे टळले आहे. या मुळे पुन्हा नांदूरखी या ठिकाणी एकाच दिवशी कधी कधी पाच पाच मृत व्यक्तीचेही दशक्रिया विधी संपन्न होऊ लागले आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून संपूर्ण जग कोरोणाच्या महामारीमुळे ग्रस्त झाले असल्याने केंद्र आणि राज्य सर कारणेही कोरो नाचे नियंत्रण थोपविण्यासाठी कधी संचारबंदी कधी जमाव बंदी कधी कधी लॉकडाऊन हे नियम अमलात आणले होते. त्यातून देशातील व राज्यातील जनता हि या महामारीचा संघर्ष करून पुन्हा नव्या उम दिने आपल्या जीवणाचा प्रवास करीत आहे.
या भागातील काही जेष्ठ मंडळी म्हणतात की या भागातील कावळ्यांनी हि लॉक डाउन चे नियम पाळले होते का हे सगळं घडत असताना केंद्र आणि राज्यानेही देशातील व राज्यातील सर्व देवस्थाने शालेय विभाग सिनेमा गृह रेल्वे स्टेशन आदी ठिकानावरील निर्भन्द शंभर टक्के कमी केले हवं त्याच धर्तीवर येथील कावळ्यांनी केंद्राचे आणि राज्याच्या नियमांचे पालन करून आता मुक्त संचार केला आहे की काय असेही या ठिकाणी बोलले जात आहे या घाटावरील पुन्हा दशक्रिया विधीची गर्दी पाहून या भागातील मृत पावलेल्या नातेवाईकांच्या मनामध्ये दुःखाचा विरह सहन करताना काकस्पर्श होऊ लागल्याने काही प्रमाणात आनंदाच्या लहरी भरून येताना दिसत आहेत.
विद्युत संचाच्या तारांना गेली काही वर्षांपूर्वी एक कावळा लटकून मृत्युमुखी पडल्याने या ठिकाणी काकस्पर्श होत नव्हता मात्र आता या ठिकाणी काकस्पर्श होऊ लागल्याने गरीब कुटुंबाला बाहेर ठिकाणी जाण्याचा ताण कमी होणार आहे:- ज्ञानदेव चौधरी(माजी सरपंच.
श्री कृष्ण मंदिर हे गोदावरी कालव्याच्या कडेला असल्याने अनेक वर्षांपासून शिर्डी बिरेगाव कोरहाळे नांदूरखी खुर्द नांदूरखी बुद्रुक या भागातील दशक्रिया विधी या ठिकाणी संपन्न होतात यापुढेही येथे चांगल्या पद्धतीने धार्मिक विधी संपन्न होतील:-अर्जुनराव चौधरी(चेअरमन झोटिंगबाबा दूध संस्था)
खरोखरच नांदूरखी दशक्रिया विधी ठिकाण शिर्डीकरांसाठी सोयीचे..!
शिर्डी भागातील अनेक दशक्रिया विधी नांदूरखी घाटावर संपन्न होत असतात दशक्रिया विधी हा सकाळी लवकर असल्याने बऱ्याच लोकांना अन्य ठिकाणी जाणे किंवा वेळेचे बंधन असल्याने सदर विधीला जाण्याची इच्छा असतानाही टाळाटाळ होत असे आपण नगराध्यक्ष असताना या भागातील घाट सुशोभी करणासाठी मदत केली असून यापुढेही आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा भाग सुशोभीत करण्याचा प्रयत्न करू:-कैलास बापू कोते(प्रथम नगराध्यक्ष शिर्डी नगर पंचायत
या दशक्रिया घाटावर महिलांची सदर ठिकाणी कपडे बदलण्यासाठी आमच्या आजी स्वर्गीय नानीबाई बाजीराव कोते यांच्या स्मरणार्थ या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे या पुढेही माणुसकी च्या भावनेतून काही मदत असल्यास आपण सहकार्य करू:- विजय कोते(अध्यक्ष साई निर्माण ग्रुप शिर्डी

