shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पूर्णा येथे औद्योगिक वसाहत एम आय डी सी स्थापन व्हावी-जलील पटेल


पूर्णा । प्रतिनिधी : जलिलभाई पठाण यांनी पूर्णा येथे औद्योगिक वसाहत व्हावी यासाठी निवेदन देऊन सतत पाठपुरावा केला आहे.
व त्यांनी व्यक्त केले की,
पूर्णा येथे औद्योगिक वसाहत- एमआयडीसी स्थापन व्हावी अशी तालुक्यातील लोकांची जुनी मागणी आहे; परंतु या प्रकरणी शासकीय, प्रशासकीयस्तरावरुन तातडीने कार्यवाही होत नसल्याने प्रकरण 'जैसे थे'च राहत आहे.

 सदर बाब मी, आमचे नेते माननीय मंत्री, नामदार जयंत पाटील साहेब यांच्या निदर्शनास आणून दिली व याबाबत पुढाकार घेण्याची विनंती केली असता मा. पाटील साहेबांनी माझी विनंती मान्य करून प्रस्तुत प्रकरणात माननीय उद्योग मंत्री नामदार सुभाष देसाई यांच्याकड़े शिफारस केली असून प्रसंगी मा. उद्योग मंत्री व संबंधित अधिकाऱ्यासोबत बैठक घेण्याचेही आश्वासन दिले आहे.

लोकनेते, विकासभिमुख नेतृत्व मा. जयंत पाटील साहेबांचे मनःपूर्वक आभार...🙏
- जलील पटेल
close