कौठळी शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप
इंदापूर प्रतिनिधी:दि.११ मार्च रोजी जि प प्राथमिक शाळा कौठळी येथे मोफत गणवेश वाटप करण्यात आले.समग्र शिक्षा अंतर्गत जमा झालेल्या अनुदानातून सर्व मुली,अनु जाती-जमातीची मुले,दारिद्र्य रेषेखालील मुले यांना मोफत गणवेश शासकीय परिपत्रकानुसार वाटप करण्यात आले.
प्रत्येकी एक एक गणवेश वाटप करण्यात आला.यावेळी शाळा व्य समितीचे अध्यक्ष श्री सुभाष पिसाळ,शाळा व्य समितीचे सदस्य श्री साहेबराव पिसाळ,श्री सुरेश पाटोळे, श्री भानुदास पाटोळे,शाळा व्य समिती सदस्या सोनाली माने सह शिक्षक,पालक, विद्यार्थी उपस्थित होते.*

