नगर प्रतिनिधी : ( तुषार महाजन )
राहाता येथील प्रख्यात शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. किरण गोरे व सोनोग्राफी तज्ञ अश्विनी गोरे राजगुरू यांच्या निवासस्थानी भेट देऊन केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकार मंत्री रामदास आठवले यांनी डॉक्टर गोरे कुटुंबियांचे सांत्वन केले.
सुवर्णपदक प्राप्त देशातील प्रख्यात शस्त्रक्रिया व पोट विकार तज्ञ डॉ. किरण गोरे व डॉ. अश्विनी गोरे राजगुरू यांचा १४ वर्षांचा मुलगा अभिनव याचे नुकतेच निधन झाले. मंत्री आठवले राहाता तालुक्याचे दौऱ्यावर आले असता त्यांनी डॉ. गोरे कुटुंबियांची आवर्जून भेट घेतली. अभिनवच्या निधनाची बातमी समजल्यानंतर मंत्री ना. आठवले यांनी दूरध्वनीद्वारे संदेश पाठवून शोक व्यक्त केला होता. शुक्रवार मंत्री ना. आठवले यांनी दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास डॉ.गोरे यांचे निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
यावेळी रिपाइंच ज्येष्ठ नेते बाळासाहेब गायकवाड, युवक रिपाईच जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, पत्रकार किरण वाबळे उपस्थित होते. सार्वजनिक जीवनात अत्यंत व्यस्त असतानाही ना. आठवले घरी आले. त्याच्यातील माणुसकौला खरोखरच सलाम आहे. माझा मुलगा अभिनय आजारी असताना सुद्धा त्यांनी विचारपूस केली होती, अशी भावना डॉ. गोरेंनी व्यक्त केली. निवासस्थानी आल्यानंतर अभिनव याच्या प्रतिमेला पुष्पहार घालून मंत्री ना. रामदास आठवले यांनी वंदन केले. डॉ.गोरे दाम्पत्याचे सांत्वन करून हे दुःख झेलण्यासाठी परमेश्वराने या परिवारास ताकद द्यावी, अशी प्रार्थना केली.

