shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्रात मेगाभरती, विविध विभागात तब्बल ५०हजार पदांची भरती..!

ठाकरे सरकारचा भरती प्रक्रिया राबविण्याचा मेगा प्लान तयार..,?

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क:
कोरोना काळात रखडलेल्या विविध विभागात भरती प्रक्रिया न झाल्याने अनेक विभागांत प्रशासनाचे काम मंदावल्यामुळे ठाकरे सरकार मेगा भरती करणार आहे.  महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागामध्ये तब्बल 50 हजार पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे . कारण रिक्त पदांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढले आहे . यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे .

यामध्ये राज्य शासनाच्या 42 विभागामध्ये भरती प्रक्रिया केली जाणार आहे . या महाभरती मध्ये प्रामुख्याने जलसंपदा विभागामध्ये तब्बल 14 हजार पदांसाठी भरती केली जाणार आहे .तर गृह विभागामध्ये 12500 पदासाठी व ग्रामविकास विभागामध्ये 6500 पदांसाठी भरती केली जाणार आहे .

त्याचबरोबर आरोग्य विभाग – 5000 पदे , कृषी व पशुसंवर्धन विभाग – 4300 तर शालेय शिक्षण विभागामध्ये 8 हजार जागांसाठी मेगाभरती केली जाणार आहे .ही भरती प्रक्रिया एप्रिल नंतर राबविण्यात येणार आहे . तसेच ही भरती प्रक्रिया तीन टप्प्यांत राबविली जाणार आहे .जलसंपदा विभागामध्ये मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहेत . यामुळे या विभागामध्ये लवकरच भरती केली जाणार आहे .

यामुळे राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना नौकरीची संधी लवकरच मिळणार आहे .
close