shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्रीमती सुशिला काशीनाथ पाथरूट यांची सामाजिक सेवा आदर्शदायी...!!

मंगळवेढा । प्रतिनिधी :-
श्रीमती सुशिला काशीनाथ पाथरूट हे संताची भूमी मंगळवेढा सोलापूर येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण : डि एड सामान्य आणि मूकबधिर साठी घेतले आहे त्यांचे पतीने स्थापित केलेल्या मूकबधिर शाळा दामाजीनगर ता. मंगळवेढा जि. सोलापूर येथे कार्यरत आहे. त्या संस्थेच्या अध्यक्षा आहेत,.संस्थेचे नाव श्री संत दामाजी अपंग सेवा मंडळ, मंगळवेढा असे आहे. त्यांना खास आवड म्हणून "समाजसेवा हीच ईश्वरसेवा" समजतात. रोटरी क्लब व इतरही अनेक सामाजिक संस्थाकडून सन्मानित करण्यात आले आहे. 

लग्नानंतर डीएड (सामान्य) आणि डीएड (मूकबधिर) कोर्स पुर्ण केले. पतीसोबत दिव्यांग (अपंग) मुलांची सेवा करण्यासाठी संस्था स्थापन केली. आज सदर संस्थे अंतर्गत पाच ठिकाणी शाळा सुरु आहेत. वेळ प्रसंगी मंगळसूत्र गहाण ठेवून आपल्या कडून काहिही कमी पडू न देतादिव्यांग मुलांची अखंडपणे सेवा केली.  

वसतिगृहात मुलांना स्वत स्वयंपाक करून सेवा दिली आहे.. 1989 ते आजपर्यंत संस्थेच्या अध्यक्षा म्हणून कार्यरत आहेत. त्यांना दोन मुले असून शिक्षण क्षेत्रात आहेत. त्यांना त्यांच्या पती निधनानंतर मुलेच सहारा देत असून आता संपूर्ण कारभार सांभाळत आहेत. अश्या ताईला मानाचां मुजरा म्हणून जागतिक महिला दिनानिमित्त समाज रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
close