प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
अहमदनगर: दि. १ / अहमदनगर जिल्हा बुद्धिबळ संघटना आयोजित अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंसाठी जिल्हा निवड बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा रविवार दि ६ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. स्पर्धेचे ठिकाण:- नागर महाजन वाडी, जुना कापड बाजार, अहमदनगर येथे आयोजित केली आहे.
दि. १ जाने २०१० नंतर जन्मलेले खेळाडू व दि. १ जाने २०१४ नंतर जन्मलेले म्हणजेच ८ वर्षा खालील व १२ वर्षा खलिल खेळाडू यांच्यासाठी जिल्हा निवड स्पर्धा आयोजित केली आहे.
४ मुले व ४ मुली पुणे व नागपूर येथे अहमदनगर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतील. प्रवेश फी रू . २००/_ सर्व सहभागी खेळाडूंना प्रमाणपत्र देण्यात येतील.
अधिक माहिती साठी सपंर्क
मनिष जसवाणी-- 8855002332
देवेंद्र ढोकळे-- 9511656063

