shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

महाराष्ट्र इतिहासात प्रथमच एका कुटुंबात तब्बल चार वडार कन्या पोलिस..!

पुणे । प्रतिनिधी:-
सौ / श्री वत्सला अंबर भगवंता पवार आळेफाटा ता जुन्नर जिल्हा पुणे येथील हया माय बाप दोघानी अत्यंत बिकट परिस्थिती खूप हलाखीचे जीवन खोदकाम करून कष्ट हेचं फळ समजून आपल्या ४ मुली आणि एका मुलाला उच्च शिक्षणं (MBA) देवुन वडार समाजाच्या एका कुटुंबात तब्बल ४ मुली पोलिस खात्यात सेवेत रुजू आहेत महाराष्ट्रात इतिहास घडवला आहे. अश्या माता पित्याला मानाचा त्रिवार सलाम केले तरी ते कमीच पडेल..!

या भगिनी पुढीलप्रमाणे...
१) कु प्रियांका अंबर पवार पुणे ग्रामीण पोलीस; २) कु रूपाली अंबर पवार मुंबई पोलीस; ३) कु दिपा अंबर पवार पुणे सिटी पोलिस
४) कु सपना अंबर पवार पिंपरी चिंचवड पोलिस..!
 सर्वच ४ भगिनीचे अभिनंदन आणि त्यांना मंगलमय खूप खुप शुभेच्छा..!

जागतीक महिला दिनानिमित्त दिनांक १३ मार्चला पुणे येथे होणाऱ्या कार्यक्रमात त्या माता पित्याला आदर्श माता पिता पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे.
close