काम करत राहणे हीच भाऊंची शिकवण आपणाला प्रेरणादायी - हर्षवर्धन पाटील.
कर्मयोगी शंकरराव पाटील भाऊ यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी:कर्मयोगी कारखाना स्थापन करताना शंकराव पाटील भाऊ यांच्या वरती मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र त्याकडे भाऊंनी नेहमीच दुर्लक्ष केले .काम करत राहणे हीच भाऊंची शिकवण आपणाला प्रेरणादायी ठरत आहे.
असे गौरवोद्गार राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काढले
इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी शंकरराव पाटील भाऊ यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त महाशिवरात्रीस कर्मयोगी शंकरराव पाटील भाऊंच्या प्रतिमेस व पूर्ण कृती पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर ऊस उत्पादक सभासद संचालक कामगार यांना संबोधित करताना हर्षवर्धन पाटील बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ सभासद सोपान दशरथ नलवडे होते.यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष भरत शहा, विधी सहाय्यक नरुटे, कार्यकारी संचालक देवराव लोकरे यांनी या वेळी मत व्यक्त केले.
यावेळी कारखान्याचे संचालक , सभासद ,अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हर्षवर्धन पाटील पुढे म्हणाले की मागील दोन ते तीन वर्षांमध्ये आपणाला साखर कारखानदारीत मोठा त्रास झाला. मात्र तुमच्या सहकार्यामुळे कारखाना अत्यंत योग्य पद्धतीने विनाखंड चालत आहे. यात कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. आज कारखान्याने नऊ लाख सहा हजार मेट्रिक टन उसाचे गाळप झाले आहे. आपणास १२ लाखांचा टप्पा गाठायचा आहे .कारखाना स्थापन करताना शंकराव पाटील भाऊ यांच्या वरती मोठ्या प्रमाणात टीका झाली. मात्र त्याकडे भाऊंनी नेहमीच दुर्लक्ष केले .काम करत राहणे हीच भाऊंची शिकवण आपणाला प्रेरणादायी ठरत आहे. महाराष्ट्राच्या मातब्बर नेत्यांपैकी कर्मयोगी शंकरराव पाटील भाऊ यांचा आग्रही क्रमांक लागत असून स्वातंत्र्यपूर्व काळापासून त्यांनी अनेक पदे भूषवली ती व्यक्ती नसून विचार आणि नैतिक अधिष्ठान असलेले अष्टपैलू व्यक्तिमत्व होते
कारखान्याच्या अडचणी संदर्भात बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले की,१८ लाख लिटर इथेनॉलचा साठा कर्मयोगी कारखान्याकडे शिल्लक असून तो साठवण्यासाठी अडचणी येत आहेत. कारखानदारीतील अशा अडचणी घेऊन आपण लवकरच दिल्ली दरबारी गृहमंत्री व सहकार मंत्री अमित शहा यांना भेटून कर्मयोगी कारखान्या बरोबरच राज्यातील इतर कारखान्याचे इथेनॉल व साखर कारखानदारीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. कर्मयोगीचे हे प्रश्न मार्गी लागले तर तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही इतक्या उंच शिखरावर आपला कारखाना असेल असाही हर्षवर्धन पाटील यांनी यावेळी म्हटले.
आपल्या मनोगतामध्ये कर्मयोगी शंकरराव पाटील भाऊ यांच्या आठवणींना उजाळा देत म्हणाले की ,स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रज राजवटीमध्ये वकिली चे उच्च शिक्षण घेणे ही सोपी बाब नव्हती. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत शंकराव पाटील भाऊंनी वकिलीचे शिक्षण घेतले १८५० -५१ साली व्यवसाय केला. १९५२ साली उच्चशिक्षणाची दखल घेत देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी कर्मयोगी भाऊंना पहिली उमेदवारी दिली आणि भाऊंनी सार्वजनिक जीवनात आपले आयुष्य वेचत जनसेवा अंगीकारून इंदापूर तालुका दुष्काळमुक्त करीत कायापालट केला. तसेच १९५२ झाली .कर्मयोगी भाऊ आमदार झाल्यानंतर १९५७ साली कर्मयोगी भाऊ आमदार झाल्यानंतर १९५७ साली महाबळेश्वर या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे चिंतन शिबिर पार पडले. यात दोन धोरणात्मक निर्णय झाले. राज्यात कृषी औद्योगिक क्रांती करायची व धरणे बांधायची असा निर्णय झाला .नवीन धरणे बांधण्याच्या निर्णयात उजनीचा देखील समावेश करण्यात आला. मुंबईहून आलेल्या अधिकारी यांच्या समवेत दोन दिवस भाऊंनी भीमा नदी पायी चालत सर्वेक्षण केले. त्यानंतर काही कालावधी अंती सोलापूर जिल्ह्यातील उजनी गावात धरण बांधण्याचे निश्चित झाले. या कामी इंदापूर तालुक्यातील ३५ ते ४० गावे पाण्याखाली गेली. तरी त्याचे पुनर्वसन करता येईल मात्र तालुकका सुजलाम सुफलाम झाला पाहिजे. यातून पुढील एक हजार वर्षाचा सिंचन प्रश्न मार्गी लागेल हा ध्यास भाऊंनी उराशी बाळगला होता. त्यानंतर इंदिरा गांधी, यशवंतराव चव्हाण ,वसंतदादा पाटील आधी राजकीय मातब्बर मंडळींना घेऊन भाऊंनी उजनीची निर्मिती केली .
कर्मयोगी शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील नीरा-भीमा आणि कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये ऊसतोड मजुरांच्या आरोग्य तपासणीसाठी मागील वर्षापासून मोफत आरोग्य सेवा सुविधा पुरवली जात आहे अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
शंकराव पाटील भाऊ यांच्या जयंतीनिमित्त आज रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी रक्त संकलन ६१ बाटल्यांचे झाले.

