shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नगर पालिका निवडणुक कार्यक्रम जाहीर झाला ! अन् काळतोंड्या उमेदवारआपल्या प्रभागात आला !!

श्रीरामपूर (प्रतिनिधी):- सध्या शहरात नगर पालिका निवडणुकीचे वारे वाहु लागल्याने त्यावर शासनाकडून नुकताच प्रभाग रचनेसह इतर निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आपली काळी तोंडे लपवून बसलेली काही संधी साधू माजी नगरसेवक भावी उमेदवार मंडळी पुन्हा आपल्या तथा आपल्या आवडीच्या प्रभागात सक्रिय झाली असल्याचे बघावयास मिळते आहे.

मात्र कोणता भाग कसा तुटेल ?,कोणता भाग कसा निर्माण होईल ? यात आपणास सोईचा भाग कोणता अधिक चांगला ठरु शकेल ? असे तर्कवितर्क काढत त्या त्या परिसरातील तरुण मंडळे, सामाजिक संघटना,प्रतिष्टित नागरीक यांच्याशी संपर्क करत त्यांची मने जुळविण्याच्या प्रयत्न काही काळतोंडी माजी नगरसेवक संधी साधू मंडळींकडून केला जात आहे.

आपल्या प्रभागातील फुकटखाऊ काही बिनकामाची टुकार बसलेली ऐंधड मुलांना खर्चपाणी देऊन आपल्यामागे लोंडा घोळवणारी ही मंडळी कोणत्याही उत्सवाची वाटच बघून आहेत,उत्सव आला रे आला की मग फुकटखाऊ मंडळी सोबत,फेकायचे त्यांना तुकडे आणि नाचवायचे डीजेच्या तालावर अन् मिरवायचे आपले मोठ मोठे फोटो व दाखवायचे आपले कार्य,मात्र या डीजेच्या आवाजाने त्रस्त होत असलेले मतदार यांना शिव्या घालत आहेत हे देखील या मुर्खांना कळत नाही.


आपल्या नगर पालिकेतील लोकसेवक नगराध्यक्ष, नगरसेवकांची कार्यकाल मुदत संपताच नगर पालिकेवर प्रशासक नियुक्त झाले आहे,मात्र त्याच दिवसापासून काही काळतोंडी नगरसेवक मंडळी ही अशी अदृष्य झाली की थेट निवडणूक कार्यक्रम जाहिर होताच समोर आली आहे,ही मिस्टर इंडिया कंपनीस शहरातील मतदारांनी चांगले ओळखले आहे,आता येणाऱ्या नगर पालिका निवडणुकीत यांना त्याचे स्पष्ट उत्तर मिळणारच आहे,तरी देखील ही काही महाभाग आपली काळी तोंडे घेऊन पुन्हा पुन्हा समोर येत असल्याने जनतेच्या मनामध्ये प्रचंड प्रमाणात प्रमाणात नाराजगी असल्याचे दिसून येत आहे.
close