shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

इंदापूर क्रीडा संकुलामध्ये होणार लॉन टेनिस सिंथेटिक मैदान - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

इंदापूर क्रीडा संकुलामध्ये होणार लॉन टेनिस सिंथेटिक मैदान - राज्यमंत्री दत्तात्रय भरणे .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहराच्या व तालुक्याच्या वैभवात भर घालणारी बाब म्हणजे क्रीडासंकुल होय. तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील खेळाडू व नागरिकांच्या सुदृढ आरोग्य करिता क्रीडा संकुलाचा वापर होत असतो. दिवसेंदिवस या क्रीडा संकुलाचा कायापालट राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असल्याचे दिसत आहे.

याचाच भाग म्हणून इंदापूर शहरवासीयांना व खेळाडूंना क्रीडा संकुलामध्ये सिंथेटिक लॉन - टेनिस या मैदानाची निर्मिती करण्यात येणार आहे.या मैदाना करिता पहिल्या टप्प्यात ३१ लाख रुपये निधी सन २०२१ - २२ या वर्षाच्या जिल्हा वार्षिक निधीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून हा निधी मंजूर केला आहे. या पूर्वीच क्रीडा संकुलामध्ये बास्केटबॉल, स्केटिंग, बॅडमिंटन हॉल, ४०० मीटर धावणे मार्ग, क्रिकेट मैदान ,फुटबॉल ,धनुर्विद्या, कबड्डी, खो-खो इत्यादी विविध सोयीसुविधा निर्मिती खेळाडू करिता करण्यात आली आहे .तसेच  क्रीडा विकासाचा भाग म्हणून सरस्वती नगर ते क्रीडा संकुल याकरिता २० लाख रुपये व रस्त्याच्या बाजूस विद्युतीकरण यास १० लाख रुपये निधी मंजूर करीत असल्याची घोषणा व माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली .

तसेच क्रीडा संकुल आधुनिक स्वरूपातील व महाराष्ट्रातील एक दर्जेदार संकुलाची उभारणी होत असून पुढील काळात इंदापूर शहर वाशी याकरता २ कोटी रुपयाची जलतरण पुलची निर्मिती करण्यात येणार असल्याची व याबाबतच्या अंतिम प्रक्रिया निर्णायक टप्प्यात आली असल्याचे तसेच ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग इंदापूर यांच्याकडून कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.
close