shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

संतपीठ अभ्यासक समितीवर महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची निवड..!!

संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज पुंडलिक महाराज मोरे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र..!!

श्री क्षेत्र  संत तुकोबाराय पावनधाम येथे पेठे वाटून स्वागत करण्यात आले.
   
प्रकाश मुंडे  | बीड जिल्हा प्रतिनिधि:-
केज  तालुक्यातील श्री क्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थानचे संस्थापक अध्यक्ष तथा अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे मराठवाडा विभागाचे अध्यक्ष ह.भ.प.महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची पिंपरी चिंचवड येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचे संत साहित्याचे अध्यासन, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ साकारले आहे.सदरील संतपीठाच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.  


आंतरराष्ट्रीय दर्जाचे संत साहित्याचे अध्यासन, जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ  पिंपरी चिंचवड पुणे येथे साकारले आहे. महाराष्ट्र राज्य शासन व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने होऊ घातलेल्या या अभिनव प्रकल्पामुळे संत विचारांचे अधिकृत अधिष्ठान प्राप्त झाले आहे. विद्यापीठ पातळीवर पदा दर्शील असणा-या या प्रकल्पात महाराष्ट्रातील संत महंत यांच्या साहित्याची व समाज उद्धार कार्याची सैद्धांतिक मांडणी करून स्वतंत्र अभ्यास शाखा निर्माण केली आहे. या संतपीठ अभ्यास नियमन समितीवर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध किर्तनकार अभ्यासक महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
      

मराठवाड्यातील दुर्गम भागात जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे जगद्गुरू तुकोबाराय पावनधाम संस्थान व भव्यदिव्य मंदिर,  उभारून महंत बोराडे शास्त्री यांनी प्रती देहू साकारले आहे. गेली 35 वर्षे महाराष्ट्र बंद वारकरी संप्रदाय प्रचार-प्रसार याच कार्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे. गुरुकुलाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी कीर्तनकार कलाकार तसेच उत्तम अधिकारी सुजाण नागरिक घडवले आहेत. महाराष्ट्र वारकरी महामंडळ या वारकऱ्यांच्या अधिकृत संघटनेचे  मराठवाडा विभागीय अध्यक्ष पदाची धुरा समर्थपणे सांभाळत आहेत. बोराडे शास्त्री यांचे हे कार्य पाहता संत पीठाच्या अभ्यासक नियमन समितीवर त्यांची सन्मानपूर्वक नियुक्ती करण्यात आली आहे.
      

जगद्गुरू तुकोबाराय यांचे अकरावे वंशज संत पिठाचे मुख्य मार्गदर्शक श्री गुरु पुंडलिक महाराज देहुकर यांच्या शुभहस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रभरातून या निवडीबाबत आनंद व्यक्त केला जात आहे. सदरील निवडीचे श्री क्षेत्र  संत तुकोबाराय पावनधाम येथे पेठे वाटून स्वागत करण्यात आले.
close