शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. सोमवार दिनांक १४ मार्च २०२२
श्री. साहेबराव नवले व श्री. ज्ञानेश्वर बोडके हे आहेत मार्च महिन्याचे महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे आयडॉल..!!
राहुरी विद्यापीठ, : महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषि उद्योजक यांचा परिचय समस्त शेतकरी वर्गाला आणि विद्यार्थ्यांना व्हावा या उद्ेशाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी नविन संकल्पना राबविली आहे.
यामध्ये दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषि पदविचा कृषि उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राच्या दर्शनी भागात तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भागात या ठिकाणी लावण्यात येतो तसेच विद्यापीठाच्या दहा जिल्ह्यांच्या कार्यक्षेत्रातील कृषि महाविद्यालये, संशोधन केंद्रे आणि कृषि विज्ञान केंद्रे येथील प्रवेशद्वाराजवळ लावण्यात येतो जेणेकरुन संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजक यांच्या कार्याचा परिचय विद्यापीठाला आणि कृषि महाविद्यालयांना, कृषि संशोधन केंद्रांना व कृषि विज्ञान केंद्राना भेट देण्यासाठी येणार्या शेतकरी, अधिकारी व विद्यार्थ्यांना होतो. तसेच या व्यक्तिंचा आदर्श घेऊन तरुण शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळते.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांच्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रत्येक महिन्याला प्रदर्शीत करण्यात येतात.
मार्च 2022 या महिन्याकरीता शेतकरी आयडॉल म्हणुन माण (बोडकेवाडी), ता. मुळशी, जि. पुणे येथील श्री. ज्ञानेश्वर बोडके व कृषि उद्योजक म्हणुन पुणे कृषि महाविद्यालयातून बी.एस्सी (कृषि) चे शिक्षण घेतलेले मालदाड, ता. सांगमनेर, जि. अहमदनगर येथील श्री. साहेबराव नवले यांचा समावेश आहे. श्री. ज्ञानेश्वर बोडके यांनी अभिनव फार्मर्स क्लबच्या माध्यमातुन महाराष्ट्राच्या 30 जिल्ह्यातील 250 शेतकरी गट जोडलेले असून महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश आणि राजस्थानमधील 1 लाख 56 हजार शेतकरी जोडलेले आहेत. या क्लबमुळे उत्पादक ते ग्राहक अशी थेट मार्केटींग सेंद्रिय भाजीपाला, फळे, धान्य व दुध इ.च्या विपणनासाठी ऑनलाईन पोर्टल (अभिनव कार्ट) द्वारे विक्री केली जाते. कृषि उद्योजक असलेले श्री. साहेबराव नवले यांनी जलसंधारणाच्या कामाची सुरुवात मालदाड या गावापासून केली. पूर्ण जिराईत असलेले मालदाड गाव 100 टक्के बागायती केले. श्रमिक कृषि सेवा केंद्र, श्रमिक मिल्क अँड फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज तसेच एस.आर. नवले पाटील पेट्रोलियम या उद्योगाच्या माध्यमातून 750 हुन अधिक कुटुंबांना कायमस्वरुपी रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. त्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये तीन लाख कडुनिंबाच्या झाडांची लागवड केलेली आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

