shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

माझ्या चितेवर- आकाश सुपारे

माझ्या चितेवर आता एकही अश्रू ढाळू नकोस
माझ्या मरणाचा सुतक पण पाळू नकोस
जरी कळलो असेल मी आज तुला
तुझं भविष्य पण जाळू नकोस....
आकाश सुुुुपारे

क्षणभंगुर असते जिंदगी
 ओंझळीतल्या पाण्या सारखी 
आता डोळ्यातले पाणी घट्ट आडवं
अन तुझ्यातच तू सावित्रीबाई घडवं...

त्याला धर्म, वर्ण, परंपरा ह्यातल
 काहीही सांगु नकोस
त्याला ज्योती साविञीचा 
सार्वजनिक सत्यधर्म आवर्जून शिकव...

बघ... एकच शेवटचं सांगतो तुला 
कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा
एक ग्रंथ त्याला आवर्जून वाचायला दे
तो ग्रंथ म्हणजेच लोकशाहीचा प्राण
तो ग्रंथ म्हणजे भारतीय संविधान
तेव्हाच मला तुझ्यावर वाटेल अभिमान

ज्या दिवशी मी मेलेला दिवस तुम्ही
आनंदोत्सव म्हणुन साजरी करणार
त्या दिवशी मी समजुन जाईल ह्या
 देशात मानवता कधीच मरत नाही
मरतात फक्त शरीरं
माणसे कधिच मरत नाहीत
निट बघीतल तर ती तुमच्या अवती भोवतीच असतात
अवती भोवतीच असतात.......

आकाशसुपारे
9822510254
close