राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १७-३-२०२२
सावित्रीबाई फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विदयालयाच्या हरीत सेनेतर्फे नैसर्गिक रंग निमिर्ती ची कार्यशाळा घेण्यात आली.
धुलीवंदन आणि रंगपंचमी निमित्ताने विद्यार्थ्यांनी रसायनिक रंग न वापरता आपल्या घरीच रंग बनवून रंग खेळण्याचे आवाहन हरित सेनेतर्फे करण्यात आले.कार्यशाळेत मार्गदर्शन करतांना हरित सेनेचे बाळासाहेब डोंगरे म्हणाले की रासायनिक रंगामुळे डोळे चुरचुरणे,त्वचेला खाज येणे, घसा खवखवणे इत्यादी त्रास होतो. चांदी सारख्या रंगातील ॲल्युमिनियम ब्रोमाईड मुळे त्वचेचा कँन्सार तर काळा रंगातील आँक्साइड मुत्रशयात बिघाड होतो.
यासाठी पालक भाजी पासून हिरवा,बीटापासून जांभळा, गुलाब पाकळी पासून गुलाबी तर पळस फुला पासून नारंगी रंग तयार होतो.यांचा वापर करून रंगाचा आनंद घ्यावा. असे आवाहन केले.
विदयालयातील सर्व विदयार्थांसमोर हरीत सेनेच्या
कु.अध्वर्या आहेर,अक्षदा भुजाडी,साक्षी कोतकर, प्रियंका गावडे,आदित्य वने,साहील गा्वडे,निसर्ग काळे,आदित्य वने,ओंकार वाणी, आदित्य दोंड, बापुसाहेब दुशिंग,शुभम राऊत,वैष्णवी घोरपडे इत्यादी हरीत सेनेच्या विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत भाग घेतला.तर घनश्याम सानप,तुकाराम जाधव,संतोष जाधव, रवींद्र हरिश्चंद्रे ,अरूण तुपविहिरे,दशरथ दळवी,प्रकाश शिंदे, शमशोद्धीन इनामदार ,जितेंद्र मेटकर यांनी सहकार्य केले.
सभापती डॉ. प्रमोद रसाळ, सचिव डॉ. महानंद माने ,खजिनदार महेश घाडगे,मुख्याध्यापिका आशा धनवटे, उपमुख्याध्यापक नंदकुमार मुळे,प्रभारी पर्यवेक्षक संदेश विसपुते यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

