धन्य तुझ्या जन्मांने
नायगाव ती माती
क्रांतीसूर्यांची पत्नी
तव गुणगाव करती
स्वता क्रांती ज्योती
करी दोघे स्वप्न पूर्ती
सार्थ जोडी दोघांची
देई एक दुजास्फुर्ती
करेसमाजउथ्थापन
जाणे शिक्षण महती
वातीस लावून वाती
उजळी ज्ञान ज्योती
अंधश्रध्दे काजळली
काळ्या कभिन्न राती
तव रूपात ज्ञानाचा
दिवा मिळाला हाती
आडवे कर्मठ लोक
बांधी भीषण भिंती
रुढीपरंपरा न् जाती
दावी अज्ञान भिती
विधवा परित्यक्तांना
कळे नव्यानी नाती
दीनदुबळ्यां जनांस
दिली अद्भुत शक्ती
-- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
2)
सावित्रीजी ..
बहुजनां दीप मिळे
अज्ञान अघोर रात्री
क्रांती सूर्याची पत्नी
नाव तयांचे सावित्री
समाज प्रबोधन करी
ज्ञानवंती कवयित्री
पहिली शाळा देऊन
शिक्षणा जोडी मैत्री
परित्यक्ता अबलांची
तूचि जाहली छत्री
शिकली ती सावरली
तूचि दिधली खात्री
तेव्हा सोसलेले घाव
ठरली आनंद यात्री
युगा एखादी ज्योती
सुख समृद्धी दात्री
कुणी उडवली राळ
भुंकली रूढीं कुत्री
आज गाते गुणगान
तुझे अवघी धरित्री
-- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
3)
स्मरण ..
येत राहीलं युगे युगे
सावित्रीमाई आठवण
सलाम तव कर्तुत्वाला
समाजउत्थान जाग्रण
रे कन्या शिक्षण दिन
सावित्रीबाई जन्मदिन
चरित्र तव देई स्फुरण
निमीत्ताने सु संस्मरण
महिला शाळा उघडून
तू बदलले समीकरण
स्त्री उच्च पदस्थ शोभे
तव दूरगामी ते धोरण
झेलला राडारोडा शेण
थांबे कन्या हत्या भृण
क्रांती ज्योती झळाळी
न फिटे पिढ्यांचे ऋण
विधवापरित्यक्तां न्याय
मनामनात गं जागरण
पतिव्रता तू महात्म्याची
सार्थ समर्थ सहचारण
क्रूर प्रथा समाज व्यथा
माणसा दाविला दर्पण
चालू तव सन्मार्गावर
सार्थ खरोखर समर्पण
-- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
4)
फुले पतीपत्नी ..
पेरले आपण रोपं
सक्षम झाले खोड
फुले बहरले वृक्षां
फळे लागली गोड
फुले दांपत्या अति
समाजजागृती वेडं
दीनदलीत प्रति ती
किती मायेचीओढं
पतिपत्नचे ते नाते
उदाहरणं रेअजोड
समर्पीत हो संसार
सुटे अवघड कोडं
रे त्याग अलौकिक
त्यालाकसली तोड
प्रस्थापितांनी भले
उडवली टिकांझोड
अन्याय अत्याचारां
प्रयत्ने करी बिमोडं
गावच्या सावकारी
मोडली पुरती खोड
विधवा परित्यक्त्यां
जीवनां सुरेख मोड
शिक्षण महत्व कळे
उध्दारी लाखोकरोड
- हेमंत मुसरीफ पुणे
9730306996.
www.kavyakusum.com
5)
सावित्रीमाई ..
क्रांती सूर्य अर्धांगी
ते पतिव्रता जीवन
समाज हाच संसार
फुले खरे नंदनवन
देती एकमेकां साथ
वेचून तन मन धन
पत्नीपती कसे हवे
सर्वोत्तम उदाहरण
बंद करी क्रूर प्रथा
विधवांचे केशवपन
झगडे पुरी कराया
समाजोध्दार सपन
सत्यशोधकसमाज
खरेसमाज प्रबोधन
जन सेवा ईश सेवा
कमवले हेचि धन
शाळा सुरू करता
सोसले कसे घर्षण
सक्षमआज महिला
तेंव्हा दिले शिक्षण
विधवाअबला मुली
चाललेले ते शोषण
शिक्षण दीप उजळे
होई जीवन रोषण
गगनी तारे जितके
तितके तुमचे सगुण
प्रश्न अनुत्तरित राही
कसे फेडावे हे ऋण
-- हेमंत मुसरीफ पुणे.
9730306996.
www.kavyakusum.com
सावित्रीबाई फुले पुण्यतिथी अभिवादन..

