shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अतिक्रमण हटाव मागणीसाठी फकिरांनी केले न.प.समोर बोंबाबोंब आंदोलन..!

पूर्णा(प्रतिनिधी ):- धर्मशाळा समोरील अतिकरमण काढुन  त्याची डागडुजी करुन फकिराना राहण्यासाठी  ती गिळकुत होत असलेली जागा  मोकळी  देण्याच्या मागणी करिता सोमवारी  दि.7मार्च 2022 रोजी नगरपरिषदेसमोर  दिवसभर बोंबाबोंब आंदोलन करुन न.प प्रशासनाला जागे करण्यासाठी  आंदोलन  छेडले.न.प. ने नेहमी प्रमाणे उडवाउडवीचे उतरे देऊन वेळ मारुन नेली आहे.शहराच्या  अगदी गजबजलेल्या महाविर नगर मध्ये  गेल्या कित्येक  वर्षा पासुन भिक्षा मागुन आपली उपजिविका करणाऱ्या  फकिरा करिता राहण्यासाठी  निवासाची सोय केली होती.  



गोर गरीब भटकंती करुन राञी धर्मशाळेचा आश्रय घ्यायचे परंतु  गेल्या  काही दिवसा पासुन शहरात अतिकरमण करण्यासाठी  चढाओढ लागावी त्या प्रमाणे फकिराची धर्मशाळाही सुटु  शकली नाही. या भागात अति क्रमण  करणाराने धर्मशाळे समोर मोठाले खोके टाकून हि जागा बळकावण्याचा डाव रचला आहे. हि जागा रिकामि करावी म्हणून  फकिरांच्या मजलीस  ए इन्सानियत या संघटनेने  नगर परिषदेकडे विनवणी करुनही हि जागा रिकामी केली नाही म्हणून  सोमवारी आठवडी बाजारचे मुहर्त साधुन फकिरानी बोंबाबोंब आंदोलन सुरु केले जवळपास साडेचार तास आंदोलन चालले शेवटी न.प.ने लेखी आश्वासन  दिल्या वर आंदोलन  मागे घेण्यात आले.

आंदोलनाचे नेतुत्व माजी नगरसेवक महेबुब कुरैशी. व संजय वाघमारे यांनी  केले  या आंदोलनात सलीम शाह सिकंदर शाह.मगबुल छोटु शाह.अय्युब शब्बीर शाह.हुसेन शाह महेबुब.मुनीर शब्बीर शहा. सादिक सिराजोदीन शाह. मुन्नाशाह.अहेमद सिराजुद्दिन शाह. नजीम जूम्मा शाह. अनिंस हैदर शाह यांनी केले.
close