राहुरी । प्रतिनिधी (जावेद शेख )दि.७-३-२०२२ :-
उम्मती सोशल वेलफ़ेयर सोसायटी, मेमन जमात श्रीरामपुर व तुलसी आय हॉस्पिटल नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि.६ मार्च २०२२ रोजी 'मोफत मोतीबिंदु, काचबिंदु, तिरळेपणा व इतर नेत्रविकार निदान व उपचार शिबिराचे' आयोजन खासदार गोविंदराव आदिक उर्दू हायस्कूल श्रीरामपूर येथे करण्यात आले होते. सदर शिबिराचा जवळपास ४८० रुग्णांनी लाभ घेतला.
सदर शिबिरासाठी अध्यक्ष म्हणुन वैद्यकीय अधिकारी डॉ.वसंतराव जमदाडे तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन अविनाश जी आदिक माजी नगराध्यक्षा अनुराधा ताई आदिक माजी उपनगराध्यक्ष हाजी अंजुमभाई शेख, माजी उपनगराध्यक्ष हाजी मुझफफर भाई शेख,माजी नगसेवक मुक्तार भाई शहा, डॉ. अक्षय शिरसाठ, जयंत चोधरी,राजेश जी अलग, रवींद्र गुलाटी, मुफ्ती रिझवान,इरफान जीवनी, फिरोज मुसानी,फारुख मुसानी, डॉ. इरफान लखाणी , तोफिक भाई एकता,जोयेब जमादार, गफ्फार पोपटिया, तुलसी हॉस्पिटलचे डॉ.पाटील आदि उपस्थित होते.
शिबिराचे उदघाटन मुफ्ती रिजवान यांच्या पवित्र कुरआन शरीफच्या पठणाने झाली. मुफ्ती साहेबांनी आपल्या प्रवचनातुन सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक 'उम्मती'चे अध्यक्ष श्री.सोहेल बारूदवाला यांनी केले. त्यांनी 'उम्मती' ही व्हाट्सअपच्या माध्यमातून एकत्र आलेली एक बिगरराजकीय सामाजिक संस्था आहे तसेच उम्मतीने आतापर्यंत आयोजित केलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
शिबिराचे अध्यक्ष डॉ.जमदाडे साहेबांनी 'उम्मती'चे तोंडभरून कौतुक केले तसेच 'उम्मती'च्या व श्रीरामपूर मेमन जमात च्या पुढील आरोग्यविषयक कार्यक्रमास सर्वतोसहकार्य करण्याचे आश्वासन दिले. माजी नगरसेवक हाजी अंजुमभाई यांनी 'उम्मती' ही कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न बाळगता अहोरात्र झटणारी एक बिगरराजकीय सामाजिक संस्था आहे असे सांगुन उम्मतीचा गौरव केला. व श्रीरामपूर मेमन जमात ला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या.डॉ.अक्षय शिरसाठ यांनी 'उम्मती'च्या यशस्वी घौड़दौड़ीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर शिबिरात मोतीबिंदु, काचबिंदु, दृष्टीदोष, तिरळेपणा व इतर नेत्ररोगाच्या जवळपास ४८० रुग्णांची मोफत तपासणी करुन त्यांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. त्यापैकी सुमारे १७० रुग्णांची मोफत शस्त्रक्रियेसाठी निवड करण्यात आली. या सर्व रुग्णांना नाशिक येथे नेण्याची, राहण्याची, जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आलेली आहे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन 'उम्मती'चे ॲड. आरिफ शेख व शाहनवाज गुलाम यांनी केले तर आभारप्रदर्शन उपाध्यक्ष फिरोज पठाण यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेमन जमात चे अध्यक्ष फिरोज पोपटिया,डॉ. सुदर्शन रनवडे युसुफभाई लाखानी, शाकीबभाई शेख, वसीम भाई जहागीरदार, साजिद सर, मतीन सर,नितीन बनकर, अलीम बागवान, समीर एस एस, आर सोहेल, शाहरुख बागवान, माजीद मिर्झा, इम्रान जीवानी, एजाज मेमन, रिजवान मेमन, हाबिबभाई आमदानी, सलीम मेमन, हुसेन जूनानी,अश्पाक मुसानी,अमजद मुसानी,फरीद मुसानी,जावेद विंधानी,मोसिन जीवानी,अमजद लाखा,अमजद पोपटिया, फारुकभाई लंघा,नदीम मेमन, इरफान मेमन, शोएब मेमन फारुख मेमन आदींनी परिश्रम घेतले.

