पूर्णा । प्रतिनिधी :- शहरातील देवीच्या मंदिरासमोर ओसाड जागेत नवीन अभिनव शाळा ईमारत परिसरात मयत सिध्दार्थ किशन गायकवाड रा. फिरस्ती वय ३० यास तिघा आरोपींनी तीक्ष्ण हत्याराने सन २०२० ला खुन केला होता.तिघा पैकी दोन आरोपींना या पूर्वी अटक करण्यात आली होती. त्या पेकी एक मुख्य आरोपी फरार होता. त्यास आरोपी सनिदेओल सुरेश काळे वय २६ यास पालम येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनेश मुळे यांच्या पथकाने सापळा रचून सिताफीने पकडले.
याकामी एएस आय भोसले, पो हवलदार नळगीरकर, होमगार्ड बोबडे, खंदारे यांनी सहकार्य केले. सदरील कार्यवाही पोलीस अधीक्षक जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय मुळे यांनी अटक करुन न्यायालयात हजर केले. तपास पो निरीक्षक सुभाष मारकड यांच्या मार्गदर्शनाखाली मुळे हे करीत आहेत.

