shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पुण्यात पहिल्याच दिवशी 22 हजार पुणेकरांचा मेट्रो प्रवास, मोबाईल तिकीट काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय...!

पुणे:-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोचे उद्घाटन केल्यानंतर सर्वसामान्य पुणेकरांसाठी मेट्रो प्रवास सुरू झालाय. त्यानंतर उद्घाटन झाल्यानंतरच्या काही तासातच तब्बल २२ हजार 437 पुणेकरांनी मेट्रोने प्रवास केलाय. यामध्ये मोबाईल तिकीट काढणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. 



रविवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन झाल्यानंतर दुपारी तीन वाजता पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील मेट्रो व्यावसायिक तत्वावर सुरू करण्यात आल्या. त्यानंतर रात्री दहा पर्यंत या फेर्‍या सुरू होत्या. उद्घाटनानंतर च्या काही तासात वनाज ते गरवारे या मार्गावर 15842 प्रवाशांनी प्रवास केलाय. तर पिंपरी ते फुगेवाडी या मार्गावर 4616 नागरिकांनी प्रवास केला आहे. रविवारी एकूण 22437 नागरिकांनी मेट्रोने प्रवास केला. यामध्ये 1979 प्रवाशांनी मोबाईलवरुन तिकीट काढले आहे.



दरम्यानच्या मार्गावर मेट्रो प्रवास सुरू करण्यात आला आहे त्या मार्गावर मेट्रो स्थानकावर पोहोचल्यापासून ते बाहेर पडण्यापर्यंत संपूर्ण यंत्रणा ही स्वयंचलित करण्यात आली आहे. तिकीट काउंटरवर ऑनलाईन पैसे दिल्यानंतर तिकीट मिळते. त्यानंतर स्वयंचलित यंत्रणेद्वारे तिकीटा वरील क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर प्लॅटफॉर्मवर जाण्यास परवानगी दिली जाते.

प्रत्येक मेट्रो तीन डब्यांची असून या तिन्ही डब्याला चार स्वयंचलित दरवाजे आहेत. मेट्रोतील संपूर्ण वातावरण वातानुकूलित आहे. त्याचबरोबर चार्जिंग ची व्यवस्थाही करण्यात आली आहे. स्वयंचलित दरवाज्यावरच्या एका स्क्रीनवर सध्या मेट्रो कुठे आहे पुढे कोणती स्थानक आहे याची देखील माहिती दर्शवली जाते.
close