shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

नीरा भीमा कारखान्याचे ६ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण - हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन.

नीरा भीमा कारखान्याचे ६ लाख मे. टन ऊस गाळप पूर्ण 
- हर्षवर्धन पाटील यांनी केले अभिनंदन.
इंदापूर : प्रतिनिधी दि.७ मार्च २०२२
  शहाजीनगर येथील नीरा भीमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन २०२१-२२ च्या गळीत हंगामामध्ये ६ लाख मे. टन ऊसाचे गाळप सोमवारी ( दि.७ मार्च ) सकाळी पुर्ण केले, अशी माहीती कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी सोमवारी ( दि.७) दिली. 
      निरा भीमा कारखान्याचा चालू २१ वा गळीत हंगाम प्रगतीपथावरती आहे. चालु हंगामातील ऊस गाळपाचा ६ लाख मे. टनाचा टप्पा पुर्ण केलेबद्दल कारखान्याचे संस्थापक व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी संचालक मंडळ, ऊस उत्पादक शेतकरी, तोडणी वाहतूक कंत्राटदार, मुकादम, तोडणी मजूर, अधिकारी, कर्मचारी, हितचिंतक यांचे अभिनंदन केले आहे. कारखान्याचे सहवीज निर्मिती प्रकल्प, इथेनॉल प्रकल्प आदी उपपदार्थ निर्मिती करणारे प्रकल्प पुर्ण क्षमतेने उत्कृष्टपणे चालु आहेत. शेतकऱ्यांच्या सर्व ऊसाचे गाळप केले जाईल. एकाही शेतकऱ्याचा ऊस गळपाअभावी शिल्लक राहणार नाही. त्यामुळे ऊस तोडी बाबत शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, असे आवाहन यावेळी अध्यक्ष लालासाहेब पवार व उपाध्यक्ष कांतिलाल झगडे यांनी केले.  कारखान्याचे संस्थापक हर्षवर्धन पाटील यांचे नेतृत्वाखाली चालू गळीत हंगामामध्ये कारखाना ७ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्धिष्ट पूर्ण करेल, असा विश्वासही यावेळी त्यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संचालक विलासराव वाघमोडे, उदयसिंह पाटील, राजवर्धन पाटील, अँड. कृष्णाजी यादव, दत्तात्रय शिर्के, दत्तूआण्णा सवासे, प्रतापराव पाटील, हरिदास घोगरे, दादासो घोगरे, संजय बोडके, प्रकाश मोहिते, मच्छिंद्र वीर, बबनराव देवकर, भागवत गोरे, चंद्रकांत भोसले, संगीता पोळ, जबीन जमादार, प्रभारी कार्यकारी संचालक सुधीर गेंगे-पाटील उपस्थित होते.

close