शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
सोमवार दिनांक ०७ मार्च २०२२
प्रहार जनशक्ती पक्षाचा देवळाली प्रवरा नगरपालिकेवर भव्य हंडा मोर्चा ०८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता ..!!
देवळाली प्रवरा - देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील राहुरी फॅक्टरी परिसरात असलेल्या प्रसादनगर भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे नळ कनेक्शन देऊन तेथील महिलांची पाण्याची होणारी परवड थांबवा या मागणीसाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे वतीने देवळाली प्रवरा नगरपालिकेवर भव्य हंडा मोर्चाचे आयोजन करणेत आले असलेचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
निवेदनात ढुस यांनी म्हंटले आहे की, प्रसादनगर भागातील काही नागरिकांना आजही नळ कनेक्शन नसलेने तेथील महिलांना पिण्याच्या पाण्यासाठी दारोदार भटकावे लागत आहे. दि. ८ मार्च हा देशभर जागतिक महिला दिन साजरा होत असताना देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागने योग्य नाही.
प्रसादनगर मध्ये कित्येक वर्षे वास्तव्य असताना व नगरपालिकेला वेळोवेळी मागणी करूनही नगरपालिका या नागरिकांना नळ जोडणी देत नाही, तसेच या नागरिकांकडून नगरपालिका सक्तीने घरपट्टी वसूल करते, मात्र नळजोडणी देत नाही. काही नागरिकांना नळ कनेक्शन व काही नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवून भेदभाव केला जात आहे, तसेच देवळाली प्रवरा नगरपालिकेचा जे कर भरीत नाही अश्या शहराबाहेरील नागरिकांना नगरपालिकेने नळ जोडणी दिली आहे, मात्र प्रसादनगर भागातील जागा खाजगी असल्याचे कारण सांगून त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी वंचित ठेवले जाते हा येथील नागरिकांवर अन्याय असून या नागरिकांची नियमानुसार नळ जोडणी फी घेऊन त्यांना तात्काळ नळजोडणी द्यावी या मागणीसाठी नामदार बच्चूभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांचे सह जिल्ह्यातील प्रहार च्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थिती मध्ये नगरपालिकेचे समोर प्रसादनगर भागातील महिलांचा प्रहार स्टाईल भव्य हंडा मोर्चाचे आयोजन दि. ८ मार्च रोजी सकाळी १०.३० वाजता करण्यात आले असल्याचे ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले असून या निवेदनाच्या प्रती नामदार बच्चूभाऊ कडू यांचेसह अहमदनगर चे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांत व प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे आदींसह राहुरी चे तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांना पाठविनेत आल्या आहेत.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

