shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दिल्लीत रेल्वे राज्यमंत्री यांना मानवतरोड परळी रेल्वेमार्गाच्या प्रश्ना साठी आ. बाबाजानी दुर्रानींचे साकडे


पूर्णा/वार्ताहर
 प्रस्तावित मानवतरोड-परळी रेल्वे मार्गा साठी आ बाबाजानी दुर्रानी यांनी सोमवार १४ मार्च रोजी रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची दिल्ली येथे भेट घेऊन या रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला गती देण्याची मागणी केली.
या वेळी त्यांच्या सोबत गंगाखेडचे माजी आ मधूसुदन केंद्रे हे होते. २०१६ च्या रेल्वे बजेटमध्ये मानवत रोड ते परळी या नव्या रेल्वेमार्गाला केंद्र शासनाकडून मंजुरी मिळाली. या नव्या रेल्वेमार्गाच्या प्रकल्पास प्रगतीपथावर आणण्यासाठी सहकार्य करण्याबाबत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची भेट घेऊन आ दुर्रानी यांनी पत्राद्वारे विनंती केली.

२०१६ साली मी बिहारचे तत्कालीन राज्यपाल व सध्या भारताचे महामहिम राष्ट्रपती असलेले रामनाथ कोविंद यांना मानवत रोड ते परळी या महामार्गाला मंजुरी मिळावी, यासाठी आ बाबाजानी दुर्रानी आणि साईजन्मस्थान मंदिर ट्रस्टींनी निवेदन दिले होते. स्वतः राष्ट्रपतींनी याबाबत संबंधित विभागाला सूचना देऊन या मार्गाला मंजुरी मिळवून दिली होती.

त्यानंतर त्यावर कार्यवाही होऊन त्यावेळच्या रेल्वे बजेट नुसार मानवत रोड ते परळी व्हाया मानवत-पाथरी-सोनपेठ-परळी या मार्गावरील ६२ किलोमीटर नव्या रेल्वेमार्गाचा सर्व्हे करण्यासाठी १० लक्ष रुपये मंजूर करण्यात आले होते . या निधीच्या माध्यमातून दक्षिण मध्य रेल्वे सिकंदराबाद यांच्यामार्फत मानवत रोड ते परळीपर्यंतच्या रेल्वेमार्गाचा सर्व पूर्ण करून याचा अहवाल २०१८ साली निर्माण कार्याचे कार्यकारी संचालक, रेल्वे बोर्ड, रेल्वे भवन, दिल्ली यांना सोपवल्याचे सांगितले जाते.

देशाचे वर्तमान राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे साईबाबांचे जन्मस्थान असलेल्या पाथरी येथील मंदिरात दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांना पाथरी साई संस्थानचे अध्यक्ष सीताराम धानु व दुर्रानी यांनी मानवत रोड ते परळी रेल्वे मार्गाच्या मंजुरीसाठी निवेदन दिले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद  १९ फेब्रुवारी २०१६ साली तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना या रेल्वेमार्गाच्या मंजुरीसाठी सूचनेचे पत्र दिले होते.

या सर्व गोष्टींच्या संदर्भाने रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची आ दुर्रांनी यांनी दिल्ली येथे भेट घेऊन त्यांना याविषयी  विस्तृत माहिती देत  हे काम प्रगती पथावर आणण्यासाठी सहकार्य करावे, अशी विनंती आ दुर्रानी यांनी केली.
close