इंदापूर तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या वतीने जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.
छायाताई पडळकर यांच्या माध्यमातून इंदापूर तालुक्यातील काटी, आजोती, पिटकेश्वर, टणु या गावात प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियान संपन्न.
इंदापूर प्रतिनिधी: ८ मार्च जागतिक महिला दिन यानिमित्त इंदापूर तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने प्रतिभा आरोग्य जनजागृती अभियान काटी, आजोती, पिटकेश्वर, टनु याठिकाणी राबवण्यात आल्याची माहिती छायाताई पळसकर यांनी दिली.
काटी गावामध्ये आरोग्य शिबीर मध्ये महिलांचे हिमोग्लोबिन चेकअप, साखरेचे प्रमाण तसेच बीपी, रक्तातील तांबड्या पेशी, पांढरे पेशी यांची तपासणी करण्यात आली. जीवनसत्व - डी, बी - १२ या गोळ्यांचे वाटप करण्यात आले. महिला सबलीकरण ,सक्षमीकरण, बचत गटांच्या माध्यमातून महिला सक्षम व्हाव्यात यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
आजोती येथे जागतिक महिला दिन निमित्त ग्राम स्वच्छता अभियान राबवले तसेच मातांना आदर्श माता पुरस्कार देण्यात आले. या नंतर सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला यामध्ये महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवून या कार्यक्रमाचा लाभ घेतला.
पिटकेश्वर येथे पर्यावरण जनजागृती व जतन करण्यासाठी माझी वसुंधरा यासाठी शपथ देण्यात आली त्याचे महत्त्व पटवून दिले.
टणू येथे बेटी बचाव बेटी पढाव या विषयावर ती जनजागृती करण्यात आली. मुलींचे प्रमाण कमी आहे हे पटवून देण्यात आले मुलगा-मुलगी समान हक्क द्यावा हा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व महिला पदाधिकारी व काटी गावच्या सरपंच रेखा मरगळ, पिटकेश्वर गावच्या सरपंच सुनिता भोसले, कृषी सहाय्यक बोराटे मॅडम, आरोग्य विभागाच्या गौरी पवार मॅडम, डॉक्टर भोसले तसेच आजोती गावातील रूपाली नगरे, दरर्दरे ताई, पोलीस पाटीलताई तसेच सर्व महिला सहचारिणी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. अशी माहिती इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर यांनी दिली.

