shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी. मध्ये 'मराठी राजभाषा दिन' व 'विज्ञान दिन' उत्साहात पार पडला.

जय भवानी गड विकास प्रतिष्ठान, लाखेवाडी. मध्ये 'मराठी राजभाषा दिन' व  'विज्ञान दिन' उत्साहात पार पडला.
     इंदापूर प्रतिनिधी:जय भवानी गड विकास प्रतिष्ठान, संचलित प्रेसिडेंसी इंटरनेशनल स्कूल व विद्यानीकेतन स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज लाखेवाडी. मध्ये २७  फेब्रुवारी *मराठी राजभाषा दिन* व २८  फेब्रुवारी  *विज्ञान दिन* या दोन्ही कार्यक्रमाचे आयोजन  करण्यात आले होते.त्यावेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी मराठी दिनानिमित्त सुविचार संग्रह, कथासंग्रह, कवितासंग्रह, दिनविशेष, संत साहित्य, कवींची ,लेखकांची माहिती, कुसुमाग्रज यांच्या कवितांचे गायन इ. स्वरूपाच्या प्रकल्पाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी उस्फुर्त सहभाग घेतला.
     तसेच विज्ञान दिनानिमित्त *भव्य विज्ञान प्रदर्शनाचे* आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जवळपास *११०* विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित विविध प्रकारचे उत्कृष्ट असे वैज्ञानिक प्रकल्प तयार केले होते,
तसेच विज्ञान दिनाचे औचित्य साधून *वैज्ञानिक रांगोळी* ही स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये जवळपास ७० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. अतिशय उत्कृष्ट व विज्ञानाची ओळख करून देणाऱ्या हुबेहुब वैज्ञानिक रांगोळी काढल्या होत्या. 
    विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा, यासाठी *प्रश्नमंजुषा* स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये विज्ञान व मराठी साहित्यावर आधारित प्रश्न विचारण्यात आले होते.
    मराठी भाषेचे महत्व व विज्ञान दिनाचे महत्त्व अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.                         
          तसेच मराठी विषय शिक्षिका सौ. पिनिता गोळे मॅडम यांनी, मराठी भाषा प्रत्येकाने जपली पाहिजे, वाढवली पाहिजे, शक्य तितके मराठीतूनच बोलले पाहिजे,पालकांनीसुद्धा विद्यार्थ्यांना साहित्य वाचण्यास प्रेरित केले पाहिजे, असे मत व्यक्त केले.
    विज्ञान विषय शिक्षिका सौ. प्रगती भोसले मॅडम यांनी विज्ञान दिनाचे महत्त्व, विज्ञान दिन साजरा का करायचा? या मागचा हेतू, व विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. तसेच मराठी व विद्यान विषय शिक्षकांचा सन्मान करण्यात आला
      संस्थेच्या *उपाध्यक्षा सौ.चित्रलेखा ढोले मॅडम* यांनी विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व पटवून  दिले, मराठी भाषेमध्ये गोडवा ,संस्कार, आपुलकी आहे. आपली मराठी भाषा काना, वेलांटी, उकार,  याने  सजलेली आहे. दैनंदिन जीवन जगत असताना आपण मराठी भाषेचा उपयोग चांगला व शुद्ध करावा, विज्ञानाचे चमत्कार, निसर्ग सृष्टी कशी अबाधित राखता येईल, भाषा व संस्कार जपत विज्ञानाची कास धरली पाहिजे. असा अनमोल संदेश दिला
 यावेळी संस्थेचे मान्यवरांच्या हस्ते विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले, संस्थेचे अध्यक्ष.  श्रीमंत  ढोले सर मुख्य सल्लागार  प्रदीप गुरव (मा. गटशिक्षणाधिकारी) संस्थेचे सचिव हर्षवर्धन खाडे, सहसचिव सौ. पौर्णिमा खाडे यांनी विद्यार्थी व शिक्षकांना मराठी व विज्ञानदिना निमीत्त शुभेच्छा दिल्या.
   सर्व स्पर्धा, कार्यक्रमाचे नियोजन यशस्वीपणे पार पाडण्यासाठी संस्थेचे प्रशासक.  गणेश पवार सर, फार्मसी कॉलेज चे प्राचार्य. खेडकर सर, सर्व विभागाचे सुपरवायझर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
close