वडापूरी येथे अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता.
श्रीनाथ मंदिर परिसरात पंचक्रोशीतील अनेक भाविक काल्याच्या कीर्तनास उपस्थित.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापूरी येथील पुरातन असे प्रसिद्ध असणारे ग्रामदैवत श्री नाथ यांची संजीवन समाधी असणाऱ्या या ठिकाणी महाशिवरात्री जागर निमित्त अखंड हरिनाम सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण सोहळा दिनांक २३ फेब्रुवारी पासून आयोजित करण्यात आला होता .
अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता आज दिनांक २ मार्च रोजी सकाळी काल्याचे किर्तन बाळासाहेब बोधले महाराज डिकसळ यांचे होते. यावेळी दहीहंडी फोडून काला वाटून सुभाष कृष्णराव नलवडे यांच्या वतीने काल्याचा महाप्रसाद देण्यात आला. त्या प्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घेऊन सप्ताहाची सांगता करण्यात आली.
श्रीनाथ मंदिराशेजारी भव्य अशा सभामंडपाचे उभारणी होत असून दोन सभामंडपाची उभारणी पूर्ण झाली असून या सभामंडपास राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निधीतून दहा लाख रुपये तसेच जिल्हा परिषद सदस्य प्रवीण माने यांच्या निधीतून दहा लाख रुपये आणि वडापुरी ग्रामस्थांच्या वर्गणीतून एकत्र करून दोन सभामंडपाची उभारणे झाली असून या दोन सभामंडपाच्या मधील भागामध्ये पत्र्याचे सभामंडप टाकण्यात येणार असून तो पत्रा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या वतीने टाकण्यात येणार असल्याचे त्यांनी स्वतः दिनांक २३ फेब्रुवारी रोजी अखंड हरिनाम सप्ताहामध्ये उपस्थिती दर्शवून उपस्थित भाविकांना संबोधित करताना घोषित केले.
अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता व काल्याच्या कीर्तनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हटले की ,सभामंडप परिसरांमध्ये जे काही कामे राहिली आहेत. त्यासाठी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपये देणार असल्याचे त्यांनी यावेळी घोषित केले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मधुकर भरणे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राजेंद्र तांबिले. जिल्हा परिषद सदस्य अभिजीत तांबिले. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अतुल झगडे. उपाध्यक्ष नवनाथ रुपनवर तसेच गावातील प्रतिष्ठित मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते.
या अखंड हरिनाम सप्ताह चे आयोजन समस्त ग्रामस्थ वडापुरी यांच्या वतीने करण्यात आले असून या कार्यक्रमांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने सेवेकर्यांनी आपापल्या परीने सेवा केली . त्यांचेही यावेळी कौतुक व ऋण व्यक्त करण्यात आले.

