shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवा शिर्डी ग्रामस्थचा अनोखा उपक्रम, अनाथांनी पाहिली "पावनखिंड"



शिर्डी । प्रतिनिधी ( संजय महाजन ):-
         नेहमी आपल्या वैविध्यपूर्ण सामाजिक छोट्याश्या कार्यक्रमाला अतिशय  उपक्रमांनी चर्चेत राहणाऱ्या आणि एखाद्या नियोजनबद्ध मूर्त स्वरूप देत कार्यक्रमाचे नकळत त्या आपोआप लोकसहभागाने मोठ्या स्वरूपात रूपांतर करण्याची किमया लीलया साकारणारी शिर्डीतील संघटना म्हणजे युवा शिर्डी ग्रामस्थ... वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत तरुणांचे मोठे संघटन उभे करणाऱ्या गरजवंताला आणि वेळेच्या आत योग्य मदत मळवून देणाऱ्या युवा शिर्डी ग्रामस्थ ह्या संघटनेने शिर्डीतील अनाथ आश्रमातील मुला मुलींना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील एका सुवर्णाक्षरांनी कोरलेल्या प्रसंगावर आधारित आणि बाजीप्रभू देशपांडे या शूरवीर मावळ्याच्या यशोगाथे आधारित दाखवत एक अनोखा उपक्रम पुन्हा एकदा यशस्वी करून दाखवत आज शिर्डी आणि जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रभर एक नवा आदर्श ठेवला आहे. 

       युवा शिर्डी ग्रामस्थचे नितीन अशोकराव कोते यांनी काही दिवसांपूर्वी आपल्या फेसबुक पेजवर आणि व्हॉट्सअॅप वर एक पोस्ट करत मित्रपरिवाराला आवाहन करत शिर्डीतील अनाथ आश्रमात असलेल्या चिमुकल्यांना आणि वृद्धांना पावनखिंड दाखवण्याचा मानस बोलून दाखवताच मोठ्या प्रमाणात मित्रपरिवाराने वर्गणी गोळा करत तब्बल 180 अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले चित्रपट या उपक्रमासाठी विशेष सहकार्य लाभलेल्या आ. राधाकृष्ण विखे पाटील परिवार, नाथगंगा थियेटरचे मालक आहेर पाटील बंधू आणि इतरांचे आभार यावेळी युवा शिर्डी ग्रामस्थ च्या वतीने मानण्यात आले.
close