इंदापूर नगरपरिषदेने घरपट्टी व पाणीपट्टीसाठी तगदा न लावता सक्तीची वसुली तातडीने थांबवा - शिवसेनेच्या वतीने इंदापूर तहसीलदार व प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद इंदापूर यांच्या नावे निवेदन पत्र सादर.
इंदापूर प्रतिनिधी: घरपट्टी व पाणीपट्टी साठी तकदा न लावता सक्तीची वसुली तातडीने थांबवा याबाबतचे निवेदन पत्र संबंधित शिवसेना पुणे जिल्हा समन्वयक विशाल बोंद्रे यांच्या पत्रा द्वारे विशाल बोंद्रे, इंदापूर तालुका शिवसेनाप्रमुख नितीन शिंदे, इंदापूर शहर प्रमुख महादेव सोमवंशी यांच्या सहीचे पत्र इंदापूर तहसीलदार व प्रशासकीय अधिकारी नगरपरिषद यांच्याकडे दाखल करण्यात आले आहे.
सदर निवेदन पत्रा मध्ये म्हटले आहे की,सध्या इंदापूर शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी खूप महागाईच्या संकटास तोंड देत आहेत. कोरोना च्या काळात त्यांचं तर कंबरडे मोडले असून दोन वर्षे अशीच गेली आहेत. काहींनी व्याजाने पैसे काढून दागिने गहाण ठेवून व्यवसाय टिकवले व उपजीविका भागवली. मात्र आत्ता इंदापूर नगरपरिषदेने वेगवेगळ्या ठिकाणी फ्लेक्स लावून वसुलीचा तगादा लावला आहे. तो थांबवावा. बोर्ड पण असे आहेत की, पाहिल्यावर सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशत टेन्शन निर्माण होईल. गेली वर्षभर शांत असलेली नगरपरिषद अचानक आक्रमक का झाली कारण निवडणूक आली आहे आणि जेवढा कर वसूल करता येईल तेवढा करावा पण समोरच्या जनतेची सुद्धा अडचण लक्षात घेणे गरजेचे आहे. गाळा धारकांचा प्रश्न कोर्टात प्रलंबित आहे. प्रचंड प्रमाणात शास्तीचा कर आकारला आहे. हे प्रश्न गंभीर आहेत . इंदापूर नगरपरिषदेतील कंत्राटी कामगार यांचा प्रश्न प्रलंबित आहे. अशी असताना घरपट्टी व पाणीपट्टी व शास्तीकराची वसुली थांबवावी अन्यथा आम्हाला मोर्चा आंदोलन करण्याची वेळ येईल याचे भान नगरपालिकेने ठेवावे.
ज्या नागरिकांनी नगरपालिकेची बांधकाम परवानगी काढली आहे. बांधकाम केले आहे पण पूर्णत्वाचा दाखला घेतला नाही त्यावर प्रचंड प्रमाणात शास्तीचा कर आकारले आहेत. त्यामुळे नागरिकांना सतत टेंशन मध्ये ठेवले जात आहे. आज जरी सरकार आमचे असले आणि नगरविकास खाते आमच्याकडे असले. तरी आम्ही जनतेसोबत आहोत .नगरविकास मंत्री या सर्व मागण्या पूर्ण करायला तयार आहेत. परंतु नगरपरिषदेने प्रयत्न करणे गरजेचे आहे तरी आपणास विनंती आहे सक्तीची वसुली तातडीने थांबवावी अशी मागणी निवेदन पत्र यामध्ये नमूद केले आहे.

