इंदापूर येथील श्रीनाथ हाऊसिंग सोसायटी बाबा चौक येथे प्रदीप गारटकर यांच्या ५९ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त गरजू व विधवा महिलांना साड्या वाटप .
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर शहरात बाबा चौकातील श्रीनाथ हाऊसिंग सोसायटी मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या ५९ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त माजी नगरसेवक राजेंद्र चौगुले, रामदास (अण्णा) चौगुले, दत्तात्रय पवार सर,मनोज पवार, रविराज पवार यांच्या वतीने गरजू गरीब व विधवा महिलांना साड्या वाटप करून सामाजिक उपक्रमाद्वारे अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला.या वेळी प्रदीप गारटकर यांचा सन्मान करून केक कापून अभिष्टचिंतन दिन साजरा करण्यात आला.
यावेळी माजी नगराध्यक्ष विठ्ठल ननवरे, माजी नगरसेवक धनंजय बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेस शहर उपाध्यक्ष उज्वलाताई चौगुले,शिवसेना समन्वयक ज्ञानेश्वर चौगुले, राष्ट्रवादी पुणे जिल्हा सचिव बाळासाहेब व्यवहारे, माजी शहराध्यक्ष अनिल राऊत, नगरसेवक वसंतराव मालुंजकर, महसूलचे मनोज आनतकर, कॉन्ट्रॅक्टर राजेंद्र पवार, माळवाडी चे उपसरपंच महादेव व्यवहारे, उमंग प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजिंक्य जावीर, तानाजी चव्हाण साहेब, निखिल बाब्रस, समासे सर, सोमनाथ पवार, विवेक चौगुले व इतर मान्यवर व महिला उपस्थित होत्या.
यावेळी प्रदीप गारटकर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की ,आपण मला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भरून उन्हात बसलात ह्याच माझ्यासाठी सर्वात मोलाच्या शुभेच्छा आहेत. अशाच शुभेच्छा गेली पस्तीस ते चाळीस वर्षापासून माझ्या पाठीशी आहेत. या भागातील सर्व जण माझ्या पाठीशी नेहमीच असतात. त्यांचे आशीर्वाद माझ्या पाठीशी असून कार्यकर्त्यांनी अनमोल असा विधवा गरीब गरजू महिलांना साड्या वाटप करून सामाजिक बांधिलकी जपून माझ्या वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबविला. त्याबद्दल मनापासून आभारी आहे. असेच माझे आपल्यावर व आपले माझ्यावर प्रेम कायम राहील याची मी खात्री देतो .अशा शब्दात त्यांनी आपले मत व्यक्त केले.

