राज्यमंत्री भरणे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी इंदापूर पंचायत समिती येथे विकास कामांची आढावा बैठक.
विकास कामांचा आढावा घेणे तसेच जिल्हा नियोजन समिती कामांचे नियोजन करणे करीता सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक यांनी
ग्रामपंचायती अंतर्गत करावयाच्या विकास कामांची यादी ग्रामपंचायती मधील कार्यकारणी सदस्यांशी चर्चा करुन बैठकीस घेऊन येण्याचे गट विकास अधिकारी यांनी केले आवाहन.
इंदापूर प्रतिनिधी: ना. दत्तात्रय भरणे , राज्यमंत्री , सामान्य प्रशासन , पशुसंवर्धन व दुग्धविकास , महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सोलापुर जिल्हा यांचे अध्यक्षतेखाली इंदापुर विकास गटातील आर्थिक वर्ष सन - २०२१-२२ मधील विकास कामांचा आढावा घेणे . तसेच आर्थिक वर्ष सन - २०२२ २३ मधील जिल्हा नियोजन समिती ( DPDC ) कामांचे नियोजन करणे करीता , सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच , उपसरपंच , ग्रामसेवक , ग्रामविकास अधिकारी यांची बैठक पंचायत समिती हॉल इंदापूर येथे दिनांक -३१ मार्च २०२२ रोजी आयोजीत केलेली आहे .
तसेच सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच , ग्रामविकास अधिकारी , ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायती अंतर्गत करावयाच्या विकास कामांची यादी ग्रामपंचायती मधील कार्यकारणी सदस्यांशी चर्चा करुन सदर कामांची यादी गुरुवार दिनांक ३१ , मार्च , २०२२ रोजी संपन्न होणाऱ्या सभेस सोबत घेवून यावे . पंचायत समिती स्तरावरील सर्व विभागप्रमुख , तालुक्यातील सर्व ग्रामपंचायत ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांनी दिनांक ३१ , मार्च , २०२२ रोजी सकाळी १०:०० वाजता पंचायत समितीचे सभागृहामध्ये विकास कामाच्या आढावा बैठकीस वेळेत उपस्थित रहावे असे आवाहन विजयकुमार परीट प्रशासक तथा गट विकास अधिकारी पंचायत समिती इंदापूर यांनी केले आहे.

