धर्मवीर संभाजी मित्र मंडळ यांच्या वतीने प्रदीप गारटकर यांचा अभिष्टचिंतन दिन सामाजिक उपक्रमाने साजरा.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर येथे पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्या ५९ व्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त धर्मवीर संभाजी मित्र मंडळ यांच्या वतीने विधवा व गरजू महिलांना साड्या वाटप करून सामाजिक उपक्रमाद्वारे अभिष्टचिंतन दिन साजरा केला. यावेळी मित्र मंडळातील सर्व सदस्यांनी गारटकर यांचा शाल व पुष्प हार घालून तसेच केक कापून अतिशय आनंद उत्सवात साजरा केला.
यावेळी मंडळाचे विश्वस्त श्रीधर बाब्रस व अध्यक्ष विनायक बाब्रस यावेळी मा.उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, मुख्याधिकारी कापरे साहेब, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे, सरचिटणीस बाळासाहेब व्यवहारे, मा.नगरसेवक राजेंद्र चौगुले, नगरसेवक वसंतराव मालुंजकर, नगरसेवक स्वप्नील राऊत, मनोज भापकर, किरण गायकवाड, अनिल चव्हाण, समीर दूधनकर, लक्ष्मण भूगे ,रमेश बनसोडे, बापू भिसे ,संतोष काळे, गणेश गोरे ,योगेश गोरे, निलेश जगताप, भारत माने इ. उपस्थित होते.
यावेळी प्रदीप गारटकर यांनी आपले मत व्यक्त करताना म्हटले की, पतित पावन संघटनेतून कामाला सुरुवात केली. अन्यायाविरुद्ध संघर्ष हे उद्दिष्ट ठेवून आज पर्यंत कार्यकर्ता ते राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी जिल्हाध्यक्ष म्हणून चा प्रवास केला. ही मजल केवळ आणि केवळ सर्वसामान्य गोरगरीब जे कार्यकर्ते माझ्या पाठीशी उभी राहिले. त्या सगळ्या जाती धर्माची लोक मनापासून पाठी मागे राहिले. माझ्याबरोबर अंग झाडून दिलं म्हणून आजचे हे दिवस ते याच्यामुळेच आहे. माणूस कितीही मोठा झाला तरी मूळ आपल्या गावापासून लांब राहू होऊ शकत नाही. जिल्हा व महाराष्ट्रातून फोन येतात की, आपण बाहेर आहेत काय? परंतु त्यांना सांगितले की ,वाढदिवस अगर मोठा सण असेल तर मी माझ्या स्वतःच्या गावांमध्ये असतो.अलीकडच्या काळात बाहेर जास्त असल्याने गावातील संपर्क कमी झाला परंतु कुठलीही अडचण असली तरी फोनवरती कायम असतो. कुठल्याही कार्यकर्त्यांची अडचण असो सोडवण्याचा प्रयत्न निश्चितपणे करतो. वाढदिवस साजरा करताना आदर-सत्कार करण्यापेक्षा गोरगरिबांसाठी सामाजिक उपक्रम राबवून साजरा करावा असे आवाहन त्यांनी यावेळी व्यक्त केले. मी जे सर्व जबाबदारी पार पाडू शकतो याच कारण फक्त माझ्या कार्यकर्त्यांचे बळ आहे. गोरगरिबांचा आशीर्वाद कायम पाठीमागे आहे. असेच कार्यकर्त्याचे भक्कम पाठबळ आहे. या जोरावर मी येथून पुढच्या काळात गोरगरिबांची सेवा निश्चितपणे करीत राहीन.
माजी नगरसेवक श्रीधर बाब्रस म्हणाले की, अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याचे धाडस हे आम्ही कदापि विसरू शकणार नाही. आपण आज अतिशय हलाखीच्या परिस्थितीतून उभारी कशी घेतली ते माझ्या डोळ्यासमोर चे आहे .मी त्याचा पुरावा आहे.कमी वयात प्रदीप गारटकर यांच्यावर घराची जबाबदारी असताना आमच्यासारख्या निवडक कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन पतीत पावन संघटनेच्या माध्यमातून अन्यायाविरुद्ध लढण्याची एक चळवळ उभा केली. त्यावेळी इंदापूर शहरातील तत्कालीन पुढाऱ्यांनी वेड्यात काढले की या मुलाला वेड लागले आहे का? आज घरामधील ही परिस्थिती असताना घरच्या प्रपंच सोडून हे काय काढलं? परंतु वेड लागलं म्हटलेले तेच खरं होतं .कारण वेडी माणसंच इतिहास घडवतात. त्या पद्धतीने दादांनी त्या काळापासून आजपर्यंत कार्यकर्ता ते जिल्हाअध्यक्ष अशी वाटचाल केली. एक अशा पद्धतीचे काम केले. अशा असंख्य गोष्टी आहेत की वेळ अपुरा पडेल. प्रदीप गारटकर हे इंदापूर तालुक्याला इंदापूर शहराला लाभलेले वरदान आहे आणि शहराला पडलेले स्वप्न आहे. अशा कर्तुत्ववान कार्यकर्ताचा, नेत्याचा सन्मान तोला मोलाने केला पाहिजे कार्यकर्ता ते तळागाळातून मोठा झालेला नेता त्यांचा सन्मान हा गोरगरीब जनतेच्या हितासाठी आणि त्याच्या भल्यासाठी करावा म्हणून आज धर्मवीर संभाजी मित्र मंडळ आणि गोरगरीब गरजू व विधवा महिलांना साडी वाटप या ठिकाणी ठेवला आहे. या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो.

