shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

देवळाली प्रवरा हद्दीतील महिलांची पाण्यासाठी भटकंती..!तात्काळ नळजोडणी द्या अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन..! - आप्पासाहेब ढुस

देवळाली प्रवरा - दि. ५ मार्च २२
देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील राहुरी फॅक्टरी परिसरात असलेल्या प्रसादनगर भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याचे नळ  कनेक्शन देऊन तेथील महिलांची पाण्याची होणारी परवड थांबवा अन्यथा प्रहार स्टाईल आंदोलन करणार असल्याचे प्रहार जनशक्ती पक्षाचे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आप्पासाहेब ढुस यांनी नगरपालिकेचे मुख्याधिकारी अजित निकत यांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. 

      निवेदनात ढुस यांनी म्हंटले आहे की, प्रसादनगर भागातील काही नागरिकांना आजही नळ कनेक्शन नसलेने तेथील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असल्याच्या तेथील नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून दि. ८ मार्च हा देशभर जागतिक महिला दिन साजरा होत असताना देवळाली प्रवरा नगरपालिका हद्दीतील महिलांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. 
       देवळाली प्रवरा नगरपालिकेने राज्यात व देश्यात विविध पुरस्कार प्राप्त करून मोठा नावलौकिक मिळविलेला असताना व नागरिकांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून देणे हे नगरपालिकेचे आद्य कर्तव्य असताना येथील महिलांची पाण्यासाठी होत असलेली परवड ही  नगरपालिकेसाठी नक्कीच भूषणावह बाब नाही. 
       प्रसादनगर मध्ये कित्येक वर्षे वास्तव्य असताना व नगरपालिकेला वेळोवेळी मागणी करूनही नगरपालिका या नागरिकांना नळ जोडणी देत नाही, तसेच या नागरिकांकडून नगरपालिका सक्तीने घरपट्टी वसूल करते मात्र नळजोडणी देत नाही.  काही नागरिकांना नळ कनेक्शन व काही नागरिकांना पाण्यापासून वंचित ठेवले जात असल्याने हा येथील नागरिकांवर अन्याय असून या नागरिकांची नियमानुसार नळ जोडणी फी घेऊन त्यांना तात्काळ नळजोडणी  द्यावी अन्यथा नामदार बच्चूभाऊ कडू यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांचे उपस्थिती मध्ये हजारो प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांसह नगरपालिकेचे समोर कोणत्याही क्षणी प्रहार स्टाईल आंदोलन उभारावे लागेल असे ढुस यांनी दिलेल्या निवेदनात म्हंटले असून या निवेदनाच्या प्रती नामदार बच्चूभाऊ कडू यांचेसह अहमदनगर चे जिल्हाधिकारी तसेच जिल्हा पोलीस अधीक्षक व प्रहार चे जिल्हाध्यक्ष अभिजित पोटे यांना पाठविनेत आल्या आहेत.
close