shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

*सहकारातून चांगली सेवा देणे हे पुण्यकर्म* - महंत रामगिरीजी महाराज


*वसंतदादा'ने खरा सहकार जपला* - आ.नरेंद्र दराडे

शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क
वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेच्या शिर्डी येथील मुख्य शाखेचा स्थलांतर सोहळा सरला बेटाचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांच्या शुभहस्ते अत्यंत साध्या पध्द्तीने परंतु मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे संपर्कप्रमुख आ.नरेंद्र दराडे तर प्रमुख उपस्थितीत साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेचे चेअरमन मा.शिवाजीराव कपाळे व साई समर्थ पतसंस्थेचे संस्थापक,शिर्डीचे मा.नगराध्यक्ष मा.शिवाजी भाऊ गोंदकर उपस्थित होते. 


यावेळी महंत रामगिरी महाराज यांनी संस्थेच्या कामकाजाची माहिती घेत सहकारातून उत्तम सेवा देणे हे पुण्यकर्म असल्याने समाजाचे नेहमी आशीर्वाद मिळतात, अशी भावना व्यक्त करत अध्यात्मिक मार्गदर्शन केले. आ.नरेंद्र दराडे यांनी संस्थेचे चेअरमन मा.मुकुंदराव सिनगर यांचे विशेष कौतुक करत श्री साईबाबांचे आशीर्वाद त्यांच्यासोबत असून संस्थेचे संचालक मंडळ प्रामाणिक सेवा देत असल्याने शिर्डीतून त्यांची मोठी प्रगती होईल, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. यावेळी संस्थेच्या वतीने महंत रामगिरी महाराजांना वस्त्रदान करण्यात आले.

सर्वप्रथम संस्थेचे संचालक मा.अच्युत शहाराम पा. सिनगर यांनी सपत्नीक श्री सत्यनारायण महापूजा करत सामुदायिक साईपठण करण्यात आले. श्री साईबाबांच्या पुण्यभूमीतून गेल्या पाच वर्षांपूर्वी वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेने महंत रामगिरी महाराज यांच्या शुभहस्ते संस्थेची सुरुवात केली होती आणि आज त्यांच्याच आशीर्वादाने संस्थेची व्याप्ती वाढल्याने आपल्या सभासदांना अधिक तत्पर सेवा देण्यासाठी संस्थेचे मुख्य कार्यालय स्वतंत्र ठेवून मुख्य शाखेचा स्थलांतर सोहळा नुकताच मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. आता वसंतदादा मल्टिस्टेट संस्थेच्या तीन शाखा असून मुख्य कार्यालयासह स्वतंत्र कर्ज विभाग कार्यरत असून असंख्य ग्राहक सभासदांच्या विश्वासावर संस्था भक्कमपणे उभी असल्याची प्रतिक्रिया संस्थेचे चेअरमन मा.मुकुंदराव सिनगर यांनी दिली. आई वडिलांच्या पुण्याईने धार्मिक वारसा लाभलेल्या भोजडे सारख्या एका छोट्या गावातून पुढे येत समाजात सहकार क्षेत्रात मोठे काम करण्याची संधी मिळाल्याने आता समाजातील शेवटच्या घटकाला आर्थिक साक्षर बनविण्याचे स्वप्न संस्थेने उराशी बाळगले आहे. मा.संचालक मंडळाच्या सहकार्याने संस्थेने अल्पावधीतच डिजिटल बँकिंगच्या माध्यमातून ग्राहक सभासदांना सर्व प्रकारच्या ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. 

शिर्डीतील व्यावसायिकांनी एकदा शाखेत भेट देऊन संस्थेच्या नाविन्यपूर्ण योजना जाणून घेण्याचे आवाहन संस्थेचे सरव्यवस्थापक गणेश वाळुंज व शाखा व्यवस्थापक श्याम सापिके यांनी केले आहे.
यावेळी संस्थेचे व्हा.चेअरमन मा.राजेश धामेजनी, संचालक मा.दीपक धट, मा.बाजीराव शेवाळे, मा.सुनिल गिते, मा.किरण सोनवणे, मा.सतीश भांगरे, मा.किशोर परजणे, मा.गणेश धुमाळ, मा.संतोष अडसूळ, संचालिका मा.सौ.सारिका सिनगर, सौ.वनिता गोंदकर, कार्यकारी संचालक श्री.बळीराम सिनगर आदींसह भोजडे, पंचाळे, रामपूरवाडी, कोपरगाव, अकोले, नांदूरखी, लाडगाव, सिन्नर, पांगरी, राहाता याठिकानाहून ग्राहक सभासद उपस्थित होते.

शेवटी संस्थेच्या वतीने आपल्या सभासदांना अल्पोपहार देऊन सर्वांच्या उपस्थिती बद्दल आभार व्यक्त करण्यात आले.
close