पूर्णा । वार्ताहर ;-
पोलिस अधीक्षक जयंत मिना यांच्या मार्गदर्शनाखाली अवैद्य धंद्याची माहिती काढुन दहशतवाद विरोधी कक्षाचे आधिकारी पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले यांनी रविवारी (दि.१३) रोजी दूपारी साडेअकराच्या सुमारास शहरातील शिवाजी नगरात धाड टाकून ७६. १०० किलो ग्रॅम वजनाचा गांजा पकडला असून संबधित आरोपींना अटक केली.
पोलिस हवदार भारत नलावडे यांनी दिलेल्या फिर्यादीनूसार आरोपी शेख अकबर शेख रजाक (वय २१), आक्रम आयुब पठाण (वय २१) दोन्ही (रा. शिवाजीनगर, सेलू ), जावेद बागवान (रा.परतूर जि.जालना) ज्याचेकडुन गांजा आणला तो मुद्देमाल ७६. १०० किलो वजनाचा ज्याची किंमत ७,६८,२००/- व दोन मोबाईल किंमत २१,०००/- असा एकूण ७,८९,२००/- मुद्देमाल जप्त केला. या घटनेतील तीन आरोपींना सेलू पोलिसांनी अटक केली असून त्यांच्या विरूध्द सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला.
पुढील तपास पोलिस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड हे करीत आहेत. या प्रसंगी दहशतवाद विरोधी कक्षाचे आधिकारी पोलिस उपनिरीक्षक विश्वास खोले, पोलिस निरिक्षक रावसाहेब गाडेवाड, नायब तहसिलदार प्रशांत थारकर, अंमलदार जावेद खॉ, सुनील राठोड , रामकिसन काळे ,अरुण कांबळे , अझर पटेल, सय्यद जाकेर, एस .एम.राठोड आदिंची उपस्थिती होती.

