आंदोलनाची तीव्रता लक्षात घेऊन परभणीचे पोलीस अधीक्षकांनी केले कडेकोट बंदोबस्त..!!
परभणी । प्रतिनिधी :-
स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा शाखा परभणीच्या वतीने सोमवारी ( दि.१४) दुपारी १२ वाजता पुर्णा - ताडकळस रोडवर बळीराजा कारखान्या समोर रास्ता रोको करण्यात येणार आहे.
परजिल्हयातुन येणारा ऊस तात्काळ बंद करून केवळ कार्यक्षेत्रातीलच ऊस गाळपास स्विकारण्यात यावा. ऊस लागवड नोंद विना अट घेण्यात यावी. १५० टनाची अट तात्काळ रद्द करावी. एफ.आर.पी. कायदा प्रमाणे १४ दिवसात ऊसाचे बिल अदा करण्यात यावे. जमा केलेल्या अनामत रक्कमा शेतकऱ्यांचा ईच्छेनुसार परत करण्यात याव्यात आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

