shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केज येथे क्रांतिसिंह नाना पाटील प्रतिष्ठाण प्रणित संघर्ष ऑटो रिक्षा युनियन संघटनेच्या वतीने मोफत पाणपोईचे उद्घाटन..!!


प्रकाश मुंडे  |  बीड जिल्हा प्रतिनिधि :-

हिवाळा संपुन काही दिवस उलटताच उन्हाळ्याची दाहकता तिव्रपणे जाणवु लागल्याने पाणीटंचाईच्या झळा पादचाऱ्यारी व गोरगरीब जनतेला बसु लागायला सुरुवात झाली असून त्याचे चटके सर्वसामान्य जनतेला व गोरगरीब पादचारी जनतेला बसु नयेत. या समाजसेवेच्या उद्देशाने केज येथील क्रांतीसिंह नाना पाटील प्रतिष्ठान प्रणित संघर्ष रिक्षा युनियन चालक मालक संघटनेच्या  सौजन्याने केज येथील कानडी चौकात  मोफत पानपोईचे काल शेकापचे भाई मोहन गुंड, डॉ केंद्रे साहेब रियाज भैया फारोकी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
 

    
या बाबत अधिक माहिती अशी की माणसाने या जगात आल्यानंतर काही ना काही तरी पुण्याचे काम केले पाहिजे.असे अध्यात्मात म्हटले आहे. आणि यात सर्वात पुण्याचे काम म्हणजे जे पाण्यासाठी तहानलेले आहेत. पाण्याविना व्याकुळ झालेले आहेत.त्यांची तहान जाणुन त्यांना पाणी पाजणे हे आहे. कारण अध्यात्मात देखील याचे सुंदर उदाहरण दिलेले आहे. नाथाला पाण्यावाचुन तळमळताना ऐक गाढव दिसले आणि  नाथांनी काशीहुन आणलेले तिर्थ अर्थात जल म्हणजे पाणी त्या पाण्यावाचुन तळमळत असलेल्या गाढवाला सारे पाणी पाजले होते. मग आपण तर माणसं अहोत.आपणही माणासाची तहान जाणली पाहिजे.

हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवुन आणि आता उन्हाळ्याला  सुरुवात झाली असुन येथुन पुढे पाणीटंचाईचा सर्वांना सामना करावा लागणार आहे. हे लक्षात घेवुन मध्यमवर्गीय व श्रीमंत व्यक्ती बिसलेरी घेवुन पाणी पितील परंतु पादचारी गोरगरीब व सर्वसामान्य नागरीकांना कशाची आलीय बिसलेरी त्यांना कुठेतरी व कसलेतरी पाणी प्राशन करून आपली तहान भागवावी लागेल.आणि तो प्रसंग त्यांचेवर येवु नये या हेतूने व समाजसेवेच्या उद्देशाने केज येथील क्रांतीसिंह नाना पाटील प्रतिष्ठान प्रणित ऑटो रिक्षा युनियन या संघटनेच्या वतीने काल दि. २१ मार्च २०२२ सोमवार रोजी केज येथील कानडी चौक येथे मोफत पाणपोईचे उद्घाटन शेतकरी कामगार पक्षाचे भाई मोहन गुंड , डॉ. केंद्रे आणि रियाज भैया फारोकी यांचे हस्ते करण्यात आले. 

या वेळी अशोक रोडे ,भरत गुंड बद्रुद्दिन फारोकी,रामहारी (बप्पा) फुंदे, ज्ञानेश्वर नेहरकर ,कल्याण राऊत, संतोष लांडगे, कृष्णा रोडे ,अनिल धुमक , मनोज पवार,शरद कांबळे ,सचिन लोखंडे ,अशोक धुमक ,मधुकर साखरे ,अमोल जाधव, श्याम लांडगे ,अकबर तांबोळी, लक्ष्मण जाधव, विष्णू पाटोळे, इसाक तांबोळी ,बंडू नरवडे ,बालासाहेब करडे ,बप्पा ठोंबरे, लक्ष्मण कांबळे, नासेर तांबोळी यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
close