प्रतिनिधी : संजय वायकर
नगर : २१ / पोलिस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र राज्य अहमदनगर यांच्या वतीने शिवजयंती उत्सवा निमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेसाठी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे विचार आजही समाजाला एकविसाव्या शतकात देखील तेवढेच प्रेरणादायी आहेत. आजच्या तरुण पिढीला उज्वल भवितव्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे दिशादर्शक असल्याचे प्रतिपादन पोलिस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते नितीन खंडागळे यांनी केले .
शिवजयंती निमित्त युवकांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
यावेळी जय भवानी, जय शिवाजीच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने सर्व परिसर यावेळी दणाणून गेला होता.
यावेळी बोलताना असोसिएशनचे उपाध्यक्ष मंदार लष्कर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी समाजातील सर्व जाती धर्माच्या समाज घटकांना एका समान धाग्यात गुंफण्याच काम केलं. रयतेसाठी कल्याणकारी स्वराज्याची निर्मिती केली. महाराजांचे हेच विचार समाजाला आजही प्रेरणादायी असून तरुण पिढीने या विचारांचे अनुकरण मोठ्या प्रमाणात करण्याची गरज आहे.
यावेळी पोलिस बॉईज असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन खंडागळे, उपाध्यक्ष मंदार लष्कर, खजिनदार संकेत पवार, सचिव सिद्धांत ससाणे, प्रकाश येणारे, संतोष सासवडे, नितीन अकोलकर, सुनिल जंबे,सुरेश फसले, किरण भापकर,किरण शिंदे, सतीश मुंडलिक, संदिप वाघमारे, संतोष जाधव,विशाल पवार, निलेश जाधव, सुरज कुरलिये,आकाश मोहिते, प्रतिक सोनवणे, जाॕन पाटोळे व सर्व सदस्य उपस्थित होते.

