shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल फेअर संघटनेच्यावतीने साईबाबा संस्थान चे चेअरमन मा नामदार आशुतोष काळे यांना निवेदन..!



शिर्डी । प्रतिनिधी (संजय महाजन) :-
 श्री साईबाबा संस्थान कर्मचारी वेल् फेअर संघटनेच्या वतीने साईबाबा संस्थान चे चेअरमन मा आमदार आशुतोष काळे यांना निवेदन देण्यात आले श्री साईबाबा संस्थान मधील कायम कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोगानुसार आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत 10 व 20 व 30 वर्षाच्या सेवेनंतर मिळणारे लाभ लवकरात लवकर लागू करावे या विषयाचे निवेदन देण्यात आले.


यावेळी संस्थान चे उपाध्यक्ष जगदीश सावंत व विश्वस्त मंडळ उपस्थित होते निवेदन देताना संघटनेचे संस्थापक प्रतापराव कोते अध्यक्ष अरुण जाधव उपाध्यक्ष प्रल्हाद मुंगसे भानुदास बावके रवींद्र सुरळे दत्तात्रय ठोंबरे सतीश धनवटे व इतर सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
close