चर्मकार विकास संघ व रविदासीया चेंबर आयोजित युवा उद्योग / व्यवसाय शिबीर अहमदनगर येथे होत आहे.राहुरी तालुक्यातुन युवक, युवती,समाज बांधवांनी शिबीरात सहभागी होऊन संधीचा लाभ घेण्याचे अहवान.मा.संजय खामकर यांनी केले.
राहुरी । प्रतिनिधी :-
राहुरी तालुका स्तरावर आज दि.२०\०३\२०२२ रविवार रोजी मा.संजयजी खामकर साहेब व मा. सोनवणे सर यांच्या मार्गदर्शना खाली अहमदनगर येथे होत असलेले उद्दोग /व्यवसास शिबीर चर्मकार विकास संघाच्या माध्यमातून निशुल्क आयोजित करण्यात येणार आहे त्या अनुषंगाने राहुरी पदाधिकारीशी सविस्तर चर्चा करण्यात आली त्यावेळेस उद्योग व्यवसाय मध्ये युवकाने कसे पुढे यावे तसेच स्पर्श परिक्षा विद्यार्थी व इतर पदवी कशाप्रकारे त्यांना मार्गदर्शन करता येईल जास्तीत जास्त युवकांनी या शिबिरात लाभ घेता येईल अशाप्रकारे मा.संजयजी खामकर साहेब यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या मिटींग मध्ये प्रमुख पाहुणे मा.रामदास सोनवणे सर (चर्मकार विकास संघ जेष्ठ सल्लागार),जिल्हाध्यक्ष मा.संतोषजी कानडे,,मा.संदिप सोनवणे(रविदासीया चेंबर्सचे संचालक), जिल्हा युवा सचिव मा.अमोल ङोळस,मा.वाकचौरे सर मा.पिरजादे साहेब (बारटी),उत्तर जिल्हाध्यक्ष मा.अर्जुन वाघ,मा.विठ्ठल देवरे (चर्मकार विकास संघ उत्तर नगर विभाग उपाध्यक्ष)मा.कैलास वाघमारे (चर्मकार विकास संघ उत्तर नगर विभाग सहसचिव)मा.निवृती देशमुख (चर्मकार विकास संघ सहसंघटक उत्तर नगर विभाग)त्याचबरोबर राहुरी पदाधिकारी मा.किरण घनदाट (राहुरी तालुकाध्यक्ष ),गणेश कानडे युवाध्यक्ष, प्रमोद वर्पे (राहुरी तालुका कार्याध्यक्ष ),राजु उदमले सचिव ,शहराध्यक्ष बाळकृष्ण वाघ रवी आहेर युवा जिल्हाध्यक्ष, त्याचप्रमाणे बाळासाहेब कांबळे,निलेश गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.या प्रसंगी राहुरी तालुक्यातुन जास्तच जास्त युवकांचा व समाज बाधंवाचा शिबीरास सहभागी असेल असे अश्वासन पदधिकारी यांनी दिले.

