राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. २०-३-२०२२
साञळ तांभेरे रस्ताच्या मजबुतीकरण व डांबरीकरण रस्त्याचा निधी स्व. माजी खाजदार दिलीप गांधी याच्या निधीतुन मंजुर झालेला असुन अनेक वेळा ग्रामस्थांकडून या कामा संदर्भात स्व. गांधी यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला होता.
त्या अनुषंगाने दिलीप गांधी यांनी सदर कामास मंजुरी दिली. प्रत्यक्षात कामास सुरूवात झाली, पण काही विरोधकांना खासदार गांधी यांचा विसर पडला. रस्त्याच्या ठेकेदारास विचारले असता सदर रस्ता २०१९ च्या लोकसभेच्या निवडणुक लागण्यापुर्वी मंजुर असलेचे तोंडी सागण्यात आले. हा रस्ता स्व. गांधी यांच्या निधीतुन मंजुर असल्या कारणाने येथील गांधी समर्थक रस्त्याच्या ठिकाणी बँनर बाजी करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब दिघे यांनी सागितले. तसेच गांधी यांचे चिरंजीव सुरेंद्र गांधी यांना पाचरण करुन रस्त्याचा लोकार्पण सोहळा करण्याचे ठरविले असल्याचे समजते.

