सुगी फौंडेशनच्या वतीने होळी धुलिवदंन महोत्सवानिमित्त असंघटीत कामगारांना किराणा किट वाटप करण्यात आला.
राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि.२०-३-२०२२
अहमदनगर जिल्ह्यात राहुरी तालुक्यातील राहुरी शहर, राहुरी कारखाना,मुलनमाथा, म्हैसगाव, वावरत जांभळी,बुफे पठार इतर विभागात असंघटित कामगार, घरकामगार महीला, एकुण शंभर गरजु कुटुंबियांना होळीच्या दिवशी होळी व धुलीवंदन महोत्सव यानिमित्ताने घरपोच किराणा किट वाटप करण्यात आले आहे,सुगी फौंडेशन आज चार ते पाच वर्षे पासुन अहमदनगर जिल्ह्यात गरजू कुटुंबांना स्वावलंबी बनविणे साठी मुलभूत आवश्यक शिबीर घेऊन काम करत आहे.
शिक्षण, आरोग्य, रोजगार, ग्रामीण भागातील रोजगार विविध क्षेत्रात सुगी फौंडेशन सामाजिक काम करत आहे, कोरोना महामारी २०२० ते २०२१ या काळात असंख्य कुटुंबींयाना किराणा दिला, मास्क बनविणे रोजगार सुरू करुन दिला होता. सुगी फौंडेशन संस्थापक अध्यक्ष मान.संदिप कोकाटे, उपाध्यक्ष मान.छाया जगधने, मान.आयशा शेख, अर्चना साबळे/कोकाटे ग्रामपंचायतसदस्य व सुगी फौंडेशनच्या सर्व पदाधिकारी यांचे गरजु कुटुंबियांनी होळीनिमित्त किराणा किट वाटप केले म्हणून गरजु कुटुंबियांनी आभार व्यक्त केले आहेत.
किराणा किट वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील व तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते मान.प्रविण गाणार,मान.शरद साळवे,मान. वर्षाताई बाचकर, मान.शरद संसारे,इतर सामाजिक कार्यकर्ते यांचे महत्त्वाचे सहकार्य मिळाले आहे. म्हणून सुगी फौंडेशनच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त केले आहेत.

