shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहावीची परिक्षा देताना डमी उघडकिस..; त्याच्याविरुध्द गुन्हा दाखल..!


पुर्णा । (प्रतिनिधी ):- 
मागीलअनेक वर्षापासून संपूर्ण राज्यामध्ये अनेक भरती चे घोटाळे गाजत आहेत यामध्ये सध्या डमी उमेदवारांचे पेव फुटले असून राज्यात अनेक ठिकाणी डमी उमेदवारांनी परीक्षा देऊन पोलीस विभागात, महसूल, आरोग्य विभागामध्ये नोकऱ्या मिळविली असल्याचे दिसून येत असून या बनावट नोकऱ्यांची रॅकेट सरकारच्यावतीने उघडे करण्याची प्रक्रिया सध्या सुरू असताना चक्क दिनांक 19 मार्च रोजी पूर्णा तालुक्यातील एका दहावीच्या परीक्षा केंद्रावर डमी परीक्षार्थी खरा परीक्षार्थी असल्याचे भासवून परीक्षा देत असल्याचा प्रकार उघडकीस आला असता डमी परीक्षार्थीने परीक्षा केंद्र मधूनच धूम ठोकली.

 परीक्षा केंद्रातील कर्मचारी व उमेदवार एकमेकांच्या मागे धावले परंतु त्याने धूम ठोकली. यामुळे त्याच्याविरुद्ध चुडावापोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील काही वर्षापासून दहावी व बारावी ची परीक्षा कॉफी मुक्त करण्यासाठी लातूर औरंगाबाद येथील बोर्डाने कडक निर्बंध घातले आहेत.

परंतु सध्या दहावीची परीक्षा सुरू असून दिनांक 19 मार्च रोजी शनिवारी इंग्रजीचा पेपर असल्यामुळे पूर्णा तालुक्यातील नावाजलेल्या धनगर टाकळी येथील राष्ट्रमाता इंदिरा गांधी स्मारक हायस्कूल मध्ये दहावीचा पेपर सुरू असताना डमी उमेदवार आरोपी कृष्णा मारुती पांढरे राहणार धर्मपुरी तालुका लोहा हा विद्यार्थी खरा परीक्षार्थी मारोती नीळकंठ काकडे राहणार पालम याच्या नावावर परीक्षा देत असल्याचे परीक्षा केंद्र चालकाच्या लक्षात आले. परीक्षा केंद्र चालकांनी यांच्याकडे स्वतः जाऊन त्याची संपूर्ण चौकशी केली असता सुरुवातीला तो मी नव्हेच असे त्यांनी उत्तर दिले.
 
परंतु आपण बनावट आहोत हे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी इंग्रजी पेपर सुरू असतानाच परीक्षा केंद्रावर पेपर त्याच ठिकाणी ठेवून धूम ठोकली.  त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता तो पळून गेला दरम्यान या ठिकाणी असलेले केंद्रप्रमुख रफिक शेख इस्माईल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चुडावा पोलीस स्थानकात डमी परीक्षार्थी कृष्णा मारुती पंढरी राहणार धर्मापुरी तालुका लोहा जिल्हा नांदेड खरा परीक्षार्थी मारोती नीलकंठ काकडे राहणार पालम या दोघांविरुद्ध चुडावा पोलीस स्थानकात कलम 417 419 34 भादवी प्रमाणे तसेच विद्यापीठाच्या घर प्रकार कायदा 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून चक्क पूर्णा तालुक्यामध्ये डमी उमेदवाराच्या नावाखाली परीक्षा देण्याचा पहिलाच प्रकार असल्यामुळे एकच खळबळ उडाली असून शिक्षण क्षेत्रामध्ये सुधा डमी उमेदवाराचे लोण पसरले असल्याची चर्चा तालुक्यांमध्ये होती.

तमिळ घटनास्थळावरून डमी डमी विद्यार्थी पळून गेला असला तरी त्याचा शोध घेणे सुरू असून त्याला लवकरच अटक केली जाईल अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक पंडित पवार यांनी दिली.
close