श्रीरामपूर - वर्ल्ड कॉन्स्टीट्यूशन अँड पार्लमेंट असोसिएशन ( डब्लूसीपीए ) अर्थात जागतिक संविधान व संसद संघाने आयोजित केलेल्या " वर्ल्ड पार्लमेंट क्लायमेट एमिसरी अवॉर्ड २०२२ व काव्यलेखन पुरस्कार २०२२ " च्या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना जेष्ठ साहित्यीक मा.श्री. यशवंतराव पुलाटे यांनी अध्यक्षस्थानावरून बोलताना दोनशे पेक्षा जास्त देशात पृथ्वी पर्यावरण अर्थात संवर्धन, संरक्षण व विकास या संकल्पनेतून कार्य करणाऱ्या पृथ्वी संसद म्हणजेच डब्ल्यूसीपीएच्या कार्याचे कौतुक करताना डब्लूसीपीए द्वारे समाजाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गुणवान व्यक्तींचा सन्मान करण्याच्या धोरणांचा गुणगौरव करताना पुरस्कार म्हणजे कार्याच्या योग्य दिशेच्या प्रवासाची सुरुवात असते असे प्रतिप्रादन केले. तसेच ग्रंथ हे गुरू आणि वृक्ष हे तारू ही भारतीय संस्कृती आज जगाला मार्गदर्शक ठरत आहे आणि संवादाने मने श्रीमंत होत आहेत असेही मत पुलाटे यांनी मांडले.
स्वर्गीय सिंधुताई विघावे यांच्या प्रतिमेचे पूजन व मान्यवरांच्या हस्ते तुलशी जलार्पण करून कार्यक्रमाचे उदघाटन झाले. डब्लूसीपीएचे महाराष्ट्र प्रमुख डॉ. दत्ता विघावे यांनी प्रास्तविक करून संस्थेच्या कार्याचा व भविष्यातील नियोजनाचा आढावा घेतला. तर डब्लूसीपीएचे ग्लोबल प्रेसिडेंट प्रा.डॉ. ग्लेन टि मार्टीन व उपाध्यक्ष प्रा. नरसिंहा मूर्ती यांनी ऑनलाईन माध्यमातून शुभेच्छा संदेश देत आपले मनोगत मांडले.
सा. अभिनव खान्देशचे संपादक मा. श्री. प्रभाकर सुर्यवंशी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या " वर्ल्ड पार्लमेंट पुरस्कार विशेषांका '' चे प्रकाशन व वर्ल्ड पार्लमेंटच्या वतीने पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या विशेष पिशवीचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संपादक मा. श्री. प्रभाकर सुर्यवंशी यांनी मनोगत व्यक्त करताना डब्लूसीपीएच्या कार्याचा गौरव केला. तर आकाशवाणी अहमदनगरचे नैमित्तिक उदघोषक संतोष मते यांनी परस्पर संवाद ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. तसेच प्रवरा कम्युनिटी रेडीओच्या स्टेशन डायरेक्टर सन्मा.सौ.गायत्री म्हस्के यांनी त्याने तिला जपले पाहिजे अर्थात मानव व पृथ्वी परस्पर संबंध स्पष्ट करत कार्यक्रम विशेष भावला असा उल्लेख करत आयोजकांचे कौतुक व अभिनंदन केले. वर्ल्ड पार्लमेंट महाराष्ट्र कार्यकारीणी सदस्या सौ.नंद अल्लूरवार यांनीही संस्थेच्या कार्याची माहीती दिली.
यावेळी बालमुकुंद गराबाद महाजन (जळगाव)
डॉ.बापूसाहेब मुक्ताजी पानगव्हाणे (राहाता )
श्री.सुभाष दशरथ वाघुंडे (श्रीरामपूर )
श्री.रेमसिंग सुरभन पावरा ( जळगाव )
श्री.हेमराज अवचित विसावे (जळगाव )
श्री दीपक गणपत पाटील,(रायगड
श्रीमती. अश्विनी त्र्यंबक गणाचार्य, ( सिन्नर )
डॉ. सोनाली सुहास कुरणे (सांगली )
डॉ.महेश भीमराव लवटे, (मुंबई )
सौ.ललिता सुरेश मुस्कवार,(चंद्रपूर )
श्री.महादू बारकू पाटील (जळगाव )
सौ.नंदा वसंतराव अल्लुरवार,(चंद्रपूर ) यांना वर्ल्ड पार्लमेंट क्लायमेट एमिसरी अवॉर्ड -२०२२
(पर्यावरणदूत पुरस्कार ) देण्यात आला. तसेच साई योग फौंडेशन राहाता या संस्थेला पर्यावरणाच्या क्षेत्रातील अद्वितीय कार्यासाठी विशेष सन्मानीत करण्यात आले. तर सामाजिक, पर्यावरण व सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्यासाठी श्री. शिरीष सुभाष वाघुंडे, (पुणे) यांना वर्ल्ड पार्लमेंट इंटरनॅशनल अवॉर्ड २०२१ हा देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर "आई " या विषयावरील राष्ट्रीय काव्यलेखन स्पर्धेतील पहिल्या पाच क्रमाकांच्या कवी / कवयत्रींना विजेते म्हणून सन्मानीत करण्यात आले. ते पुढील प्रमाणे -
वर्ल्ड पार्लमेंट काव्यलेखन पुरस्कार -२०२२.
प्रथम क्रमांक - कु. रोशनी वसंत दाभाडे, (राजगुरूनगर, पुणे), द्वितीय क्रमांक - सौ. मंदा नंदू खंडारे, नागपूर. तृतीय क्रमांक - श्री. संजय भिकाजी पांडे, नागपूर. चतुर्थ क्रमांक - प्रो.मनीषा विकास नाडगौडा, बेळगांव. ( कर्नाटक )
पाचवा क्रमांक -श्री.विलास जगन्नाथ घोडचर, यवतमाळ.
डब्लूसीपीएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. दत्ता विघावे यांच्या सुनियोजित कार्यशैलीने कार्यक्रम शानदाररित्या संपन्न झाला. संस्थेचे सचिव श्री. बाबासाहेब वाकचौरे यांनी उपस्थितांचे आभार मांडले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहसचिव श्री. ऋषिकेश विघावे, वरिष्ठ सदस्य श्री.सी के भोसले साहेब ,कोषाध्यक्ष शैलेंद्र भणगे, सदस्या सौ.जोत्स्ना थोरात यांनी विशेष सहकार्य केले. तर श्री. प्रसन्नकुमार धुमाळ व प्रा. नवनाथ अकोलकर यांनी सुंदर व सुमधूर वाणीने सुत्रसंचलन करत कार्यक्रमाचा गोडवा वाढविला.
याप्रसंगी देशभरातून अनेक जण उपस्थित होते.

