*कौठळीमध्ये राजवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाली कुस्त्यांचे आयोजन.
इंदापूर प्रतिनिधी:तुकाराम महाराज बीज उत्सव निमित्त कौठळी येथे निकाली कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले असून निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या हस्ते निकाली कुस्त्या लावून या स्पर्धेची सुरुवात करण्यात आली.
राजवर्धन पाटील यांनी यावेळी कुस्ती शौकिनांची मने जिंकली तसेच कुस्तीचा त्यांनी आनंद घेतला. युवापिढी अधिक सक्षम व्हावी यासाठी हे उपक्रम विधायक ठरतात असे मत या वेळी राजवर्धन पाटील यांनी व्यक्त केले.
यात्रा कमिटीचे प्रमुख हिरामण मारकड, माजी सरपंच प्रकाश काळेल, विठ्ठल मारकड, वसंत मारकड, नामदेव पाटील, राहुल मारकड तसेच भाजपाचे सोशल मीडिया प्रमुख साहेबराव पिसाळ या वेळी उपस्थित होते.

