शिक्षक समितीच्या वतीने पुरस्कार प्राप्त शिक्षक व नुतन पदाधिकारी यांचे सत्कार संपन्न.
जिद्द , चिकाटी , सातत्य व मेहनतीने कोणतीच गोष्ट अशक्य नाही. - संभाजी आजबे.
इंदापूर प्रतिनिधी:दि २ निमगाव केतकी येथील संत सावतामाळी मंदिरात शिक्षक समितीच्या वतीने *जिल्हा परिषद आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक सतिश भोंग , वरकुटे खु वि वि सेवा सोसा. संचालकपदी निवड झालेले किरण म्हेञे , घोरपडवाडी सोसायटी संचालकपदी निवडून आलेले अभिजीत गोरे , रोहन पिसे , शिक्षक भारतीचे संघटक संतोष चोरमले* यांचा सत्कार केंद्र प्रमुख संभाजी आजबे , शिक्षक सोसा. चेअरमन वसंत फलफले , माजी चेअरमन विलास शिंदे , सुनिल शिंदे , शिक्षक समितीचे उपाध्यक्ष नजीर शिकीलकर , सरचिटणीस विनय मखरे , सतिश खटके , सुनिल कोकाटे , शिक्षक भारतीचे जिल्हा उपाध्यक्ष पै सहदेव काळेल यांचे हस्ते फेटा , पुष्पहार , श्रीफळ , पुप्षगुच्छ देवून करण्यात आला.
*यावेळी केंद्र प्रमुख तथा शिक्षक समितीचे नेते संभाजी आजबे , सत्कार मुर्ती किरण म्हेञे , अभिजीत गोरे , सतिश भोंग , संतोष चोरमले , बापूराव जाधव , महिला आघाडी प्रमुख सुरेखा अभंग यांनी मनोगते व्यक्त केली.*
यावेळी महिला आघाडी प्रमुख रत्नमाला भोंग , सुरेश धारूरकर , किरण लंगोटे , बापूराव राऊत , नागेश जाधव , अतुल जौंजाळ , योगेश पांढरे , भुषण जौंजाळ , संजय भोंग , विकास वाघ , प्रताप शिरसट , शिक्षक भारतीचे सुनिल पवार , विलास मारकड उपस्थित होते.कार्यक्रमाचे संयोजन शिक्षक समितीचे कोषाध्यक्ष भारत ननवरे यांनी केले.सुञसंचालन संतोष हेगडे यांनी केले.आभार दिलीप राऊत यांनी मानले.

