shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अभ्यासू सुसंस्कृत नेतृत्व म्हणजेच - विक्रमसिंह मोरे अभिष्टचिंतन पर विशेष लेख.

अभ्यासू सुसंस्कृत  नेतृत्व म्हणजेच - विक्रमसिंह मोरे 

अभिष्टचिंतन पर विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी: वालचंदनगर येथील रहिवाशी असणारे उच्चशिक्षित आणि अभ्यासू , सुसंस्कृत नेतृत्व ,सर्वांना एकत्र करून मनमिळाव स्वभावातून सर्वांना आपलंसं करणारे विक्रमसिंह मोरे यांचा आज अभिष्टचिंतन दिन त्यानिमित्त त्यांना अभिष्टचिंतन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.

विक्रमसिंह मोरे यांचे वडील दादासाहेब मोरे हे उत्कृष्ट कबड्डी पट्टू होते व त्या काळी त्यांच्या नावाचा कब्बडी खेळत असताना खूप दबदबा होते.ते वालचंदनगर इंडस्ट्रीज मध्ये काम करत होते व तेथेच त्यांची २००६ मध्यें सेवा निवृत्त झाले.त्यांच्या मातोश्री  वालचंदनगर गावच्या माजी सरपंच सौ . छाया मोरे यांचे मूळ गाव अकलूज आहे.अत्यंत सामान्य परिस्थिती असताना  विक्रमसिंह मोरे व त्यांचे बंधू प्रा. चेतन मोरे यांचे शिक्षण भारत चिल्ड्रन्स अकॅडमी ह्या त्या काळच्या नामांकित शाळेत झाले . त्यांचे पुढील शिक्षण हे श्री वर्धमान विद्यालय व पदवी शिक्षण हे अकलूज मध्ये झाले. स्वताच्या जिद्द व चिकाटीने दोन भावंडांनी सर्वच क्षेत्र म्हणजे राजकीय,सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रामध्ये गगनभरारी घेतली. विक्रमसिंह मोरे यांच्या पत्नी सौ माधुरी मोरे ह्या जीवशास्त्र विषयाच्या प्राध्यापक आहेत व चेतन मोरे यांच्या पत्नी ह्या गणित व विज्ञान ह्या विषयाच्या प्राध्यापक आहेत.अत्यंत उचशिक्षित असून देखील सर्वांना मदत करण्याची भूमिका ही त्यांची असते. कोरोना काळात त्यांच्या कामाचे कौतुक हे सर्वच क्षेत्रातील मान्यवर यांनी केले.  पुणे येथे ब्रेन व्हिजन इंडिया नावाने त्यांचे ऑफिस आहे.अत्यंत मन मिळवू असणारे विक्रमसिंह मोरे हे सर्व पंचक्रोशीत सर्वांच्या परिचयाचे आहेत व मुलांना कोणत्या शैक्षणिक विषयी अडचण असल्यास ते तातडीने सोडवत  असतात. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील  यांनी त्यांच्या मातोश्री यांना सरपंच पदाची संधी दिल्यानंतर त्यांनी त्या संधीचे सोने करून वालचंदनगर मध्ये विकासाचा पाया रोवला.नीरा भीमा कारखान्याचे संचालक युवा नेतृत्व राजवर्धन पाटील यांचे अत्यंत विश्वासू व्यक्ती पैकी  विक्रमसिंह मोरे यांचे नाव घेतले जाते  . असे अभ्यासू नेतृत्व विक्रमसिंह मोरे यांच्या मातोश्री यांनी वालचंदनगरच्या सरपंचपदी पाच वर्ष कार्यभार सांभाळला व त्यातून विकास कामे केली. याचाच विचार करता विक्रमसिंह मोरे यांना राजकीय क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया चे उपाध्यक्ष म्हणून निवड होऊन ते कार्यभार सांभाळत आहेत. त्यांच्या या कार्याचा विचार करता भविष्यकाळात त्यांना राजकीय क्षेत्रामध्ये संधी उपलब्ध होतील अशी चर्चा ही असल्याचे दिसत आहे. सर्व तरुण वर्गाला व ज्येष्ठ व्यक्ती यांची आदर करून पुढे जाणारे नेतृत्व म्हणजे विक्रमसिंह मोरे होय.
close