shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चिखलीच्या सरपंच पदी सुप्रिया अर्जुन यांची बिनविरोध निवड.

चिखलीच्या सरपंच पदी सुप्रिया अर्जुन यांची बिनविरोध निवड.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील ग्रामपंचायत चिखलीच्या सरपंच पदी सुप्रिया विनोद अर्जुन यांची बिनविरोध निवड करण्यात आली. वैशाली अर्जुन यांनी सरपंच पदाचा राजीनामा दि.७ जानेवारी २०२२ रोजी  दिल्यानंतर रिक्त जागी सरपंच पदासाठी निवड प्रक्रिया दि. २८ फेब्रुवारी २०२२ रोजी पार पडली.यामध्ये सरपंच पदासाठी सुप्रिया विनोद अर्जुन यांनी अर्ज दाखल केला. उपसरपंच संदीप गायकवाड, ग्रामपंचायत सदस्य वैशाली अर्जुन, उत्तम खोमणे, हर्षदा पांढरे, मंगल शेंडगे यांच्या उपस्थितीमध्ये सुप्रिया विनोद अर्जुन यांची चिखली ग्रामपंचायत च्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी डी. व्ही. कावळे यांनी सुप्रिया अर्जुन यांची निवड झाल्याचे घोषित केले
 .यावेळी ग्रामसेवक एस.आर. लोणकर पोलीस पाटील राजू गायकवाड ,तंटामुक्ती अध्यक्ष रामदास अर्जुन , शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दादासाहेब ढवळे, कोतवाल अनिल गायकवाड ,माजी सरपंच विजय पांढरे, महादेव अर्जुन, राजाक्का गायकवाड, शिवाजी अर्जुन ,हरिश्चंद्र बंडगर, राजेंद्र अर्जुन, विजय अर्जुन, संतोष कवळे ,अशोक खिल्लारे, महादेव कवळे, विशाल दराडे, पांडुरंग दराडे ,डॉ. राहुल बागाव, गोविंद डोंबाळे ,सचिन अर्जुन, आप्पासाहेब अर्जुन, मधुकर खरात ,गिरीधर खोमणे, काशीनाथ अर्जुन, बाबुराव अर्जुन, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
close