पूर्णा । प्रतिनिधी :- दक्षिण-मध्य रेल्वेच्या रेल्वेच्या पूर्णा रेल्वे स्थानकाच्या आसपास तीन मार्चच्या पूर्वी 70 वर्षीय इसमाचे प्रेत आढळून आले आहे या प्रकरणी रेल्वे पोलिस चौकीत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तीन मार्च गुरुवार च्या अगोदर पूर्णा रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका सिग्नल जवळ एका अज्ञात इसमाचे प्रेत आढळून आले आहे. रंग काळा सावळा असून वयोवृद्ध नागरिक आहे.
याप्रकरणी रेल्वे पोलिस चौकीचे जमादार दिगंबर राठोड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पूर्णा रेल्वे पोलिस चौकीत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे अधिक तपास पोलिस जमादार देविदास राठोड हे करीत आहेत.

